सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली अभयारण्य विषयी माहिती sahyadri vyaghra praklpa chandoli abhayarany vishyi mahiti.
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याच्या तसेच कोल्हापूर रत्नागिरी व सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवर असणारे सांगली जिल्ह्यातील हे विशेषता जास्त क्षेत्रफळ असणारे अभयारण्य आहे. ज्याला इसवी सन 2004 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिला गेला आहे. चांदोली या ठिकाणी बांधण्यात आलेले वारणा नदीच्या धरण परिसरातील उगम परिसरात हे अभयारण्य विखुरले गेलेले आहे.
• प्रविष्ट स्थान :
सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील वारणा नदीचा उगम प्रदेश, तसेच तिचे पाणलोट क्षेत्र व प्रचितगड व भैरवगड या किल्ल्यांचा परिसर या अभयारण्यामध्ये विशेषत: येतो. तसेच हे अभयारण्य कोयना अभयारण्य तसेच राधानगरी अभयारण्य या दोन्ही अभयारण्याच्या दरम्यान संकरण क्षेत्रात येते.
• अभयारण्याची स्थापना :
इसवी सन 1985 साली या अभयारण्याच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली. तर हे अभयारण्य इसवीसन 2004 साली अस्तित्वात आले. हे भारतातील विशेष महाराष्ट्रातील सहाव्या नंबरचे व्याघ्र अभयारण्य आहे. कारण या विषयी संक्षिप्त माहिती या अभयारण्यात तीन वाघ असून त्या तिन्हीही माता वाघ आहेत त्यांचे वंश वाढवण्यासाठी ताडोबा अभयारण्यातून येथे वाघाची आवक केली जाणार आहे तसेच बिबटे शेकरू व हरियाल हे महाराष्ट्राचे राज्य प्राणी व पक्षी यांचा अधिवास असणारे हे अभयारण्य असून सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवर हे अभयारण्य स्थित आहे. अभयारण्य क्षेत्रफळ :
317.67 चौरस किलोमीटर पसरलेले राज्यातील सर्वात विस्तृत असे अभयारण्य हे आहे.
* अभयारण्य माहिती :
सदाहरित व निम सदाहरित अरण्याचा प्रदेश तसेच सह्याद्रीचा महाराष्ट्रातील दक्षिण घाटमाथ्याचा प्रदेश या अभयारण्यात येतो या अभयारण्यातील प्राणी गणन्यासाठी एकूण 12 विभाग करण्यात आलेले आहेत. या प्राण्यांची गणना पानस्थळ जागा ते प्राणी जाणाऱ्या पायवाटा, झाडांवरील निशान्या तसेच लपणगृह यातून केलेले निरीक्षण. जागोजागी लावलेले कॅमेरे व पाहणी क्षेत्र यावरून करण्यात येते. प्राण्यांच्या ठशावरून त्यांची गणना विशेषत होते या अभयारण्यात वाघ, बिबटे मोठ्या प्रमाणात रानगवे म्हणजे जंगली म्हैस, सांभरांच्या विविध जाती, अस्वले, शेकरू प्राणी, हरियाल सारखे पक्षी, रानडुकरे भेकरे, नागासारखे सरपटणारे प्राणी, पक्षी यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य पाहायला मिळते. इस्लामपूर मधील वनसंरक्षक एम एम पंडितराव तसेच वनक्षेत्रपाल संजय कांबळे व अनेक पर्यावरण प्रेमी व स्वयंसेवी संस्थांनी येथील प्राणी गणनेमध्ये भाग घेतलेला होता. * पावसाचे प्रमाण :
या अभयारण्यामध्ये दोन ते अडीच हजार मिलिमीटर इतका पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर महिन्याचा काळ अतिवृष्टी असल्यामुळे या प्रदेशात भ्रमंती करण्यासाठी मज्जाव आहे.
• अभयारण्याकडे जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• पुणे बेंगलोर नॅशनल हायवेवरील कराड शहरातून शेडगेवाडी - चरण मार्गे - वारणावती येथून मंजूर गावातून चांदोली रिसॉर्टकडे जाता येते. येथून जंगल सफरीसाठी असणाऱ्या गेट पर्यंत आपण पोहोचू शकतो.
• दुसरा मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील रत्नागिरी मार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरहून लव्हाळे फाटा तेथून पुढे कच्चा रस्ता लागतो या मार्गे आपण या अभयारण्यामध्ये पोहोचू शकतो.
• तिसरा मार्ग रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणावरून नायरी गावापर्यंत आपण जाऊ शकतो. तेथून प्रचितगडाकडे जाणाऱ्या पायवाटेवरून आपण या अभयारण्य परिसरात पोहोचू शकतो.
• अभयारण्य परिसराचा विस्तार :
वनक्षेत्राचा विस्तार 317.67 चौरस किलोमीटर इतका आहे. सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा हा तालुका, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्याचा परिसर, आणि रत्नागिरी जिल्ह्यातील परिसर या वनक्षेत्रामध्ये येतोो
• वनसंपदा :
हा प्रदेश सदाहरित व निमसदाहरित प्रदेशात येत असून या ठिकाणी आपल्याला फणस, आपटा, आंबा, करवंदे, जांभळे, अळू, आवळा, चांगुना, जांभूळ, माड, आपटा, ऐन, पांगारा, यासारख्या वनस्पती तसेच तमालपत्री, नरक्या, हिरडा, बेहडा, शिकेकाई, अडुळसा, कडुलिंब, बिब्बा तसेच आवळा यासारख्या औषधी वनस्पती येथे आढळतात.
• प्राणी जीवन :
या अभयारण्यामध्ये पट्टेरी वाघ, रानडुकरे, अस्वले, हरीण, सायाळ, खवले मांजर, गवा, भेकर, रान कुत्रे, वानराच्या वेगवेगळ्या जाती, हरणे, सांबर, रान मांजर यासारखे प्राणी आढळतात.
• पक्षी जीवन :
अभयारण्यामध्ये चांदोली या धरणाचे पाणलोट क्षेत्र येत असून आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये भारतीय उपखंडात आढळणारे सर्व प्रकारचे पक्षी आपणास येथे विविध ऋतूमध्ये विशेषण विनीच्या हंगामात आढळतात. या ठिकाणी गरुड, सातभाई, भारद्वाज, कवड्या, धनेश, खंड्या, घुबड, चंडोल, नर्तक, कोकीळ, पोपटांच्या विविध जाती, पिंगळा, रातवा, नर्तक, पावश्या, घुबड, चातक, बगळे, पाणकोंबड्या, पानकावळे, मोर, शक्कलखोरा, घारींच्या जाती, होले यासारखे अनेक पक्षी तसेच स्थलांतरित पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती पाहायला मिळतात.
• चांदोली परिसरात पाहण्यायोग्य स्थळे :
• कंधार डोह पाठरपुंज या पाटणकडील भागाकडून येणारा पाणलोट क्षेत्र या कंधारडोहांमध्ये येतो येथून पुढे हे पाणी वारणा धरणामध्ये येते या परिसरामध्ये एक खोल डोह तयार झालेला असून वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी व निरीक्षणासाठी हे उत्तम ठिकाण आहे
• पाठारपुंज पाटण तालुक्यातील दक्षिण बाजूला असणारे हे सह्याद्री घाटमाथ्याचे ठिकाण या ठिकाणावरून वारणा नदीचे पाणलोट क्षेत्र निर्माण होते
• भैरवनाथगड पाठारपुंज या पठाराच्या भागामध्ये असणारे जवळच भैरवनाथगड हे देखील या अभयारण्याच्या परिसरामध्ये येणारे ठिकाण आहे.
• उखळू व झोंळंबे हे प्रदेश वारणा नदीच्या दोन्ही बाजूला असून या परिसरामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची रिझर्व स्थाने निर्माण केलेली आहेत. या परिसरामध्ये वाघांचा वावर असतो. येथील गावांचे अन्यत्र स्थलांतर केलेले आहे. गावातील जुनी घरे पडलेल्या स्वरूपात तसेच तेथील पाणवठे देखील पाहता येतात. या परिसरात मोठ्या प्रमाणात कारवीचे जंगल असून हे रानगव्यांचे आवडते खाद्य आहे.
• वाल्मिकी पठार :
सातारा विभागाकडून पाटण तालुक्यात आपणास या अभयारण्याच्या परिसरात वाल्मिकी पठार असलेले पाहायला मिळते या ठिकाणी वाल्मिकी ऋषींची समाधी मंदिर असल्याचे जाणवते पाटण भागातून हे स्थान जवळ आहे
• जनीचा आंबा :
या अभयारण्यातील उंच अशा घाटमाथ्यावर एक विशाल आंब्याचे झाड आहे हे झाड अभयारण्याचे सर्वात उंच ठिकाण म्हणून ओळखले जाते. हे या अभयारण्यातील एक दिशा दर्शक नकाशाचे काम हे झाड करते.
• मंजूर परिसर चांदोली व्युहपॉइंट या ठिकाणाहून चांदोली धरणाचे पाणलोट क्षेत्र आपणास निरीक्षण करण्यास मिळते
• प्रचितगड किल्ला :
कोकण विभागास लागून असणारा संगमेश्वर पासून जवळ हा किल्ला असून हा पश्चिम बाजूस असणारा या अभयारण्याचा एक भाग असून या परिसरात आपल्याला भैरी - भवानी या देवतांची मंदिरे पाहायला मिळतात
• धोधावणे धबधबा :
अभयारण्यामध्ये वारणा नदीच्या उगम प्रदेशांमध्ये असणाऱ्या उंच सह्याद्री घाटमाथ्यावरून पडणारा हा धबधबा या अभयारण्याचा भाग आहे.
• दुर्गावाडी व सोनार्ली, खुंडलापुर विभागात देखील घनदाट जंगल आहे. तेथें सुद्धा जागोजागी प्राणी व पक्षी निरीक्षण पॉइंट आहेत.
• अभयारण्य पाहण्यासाठी विशेषत काळ :
• नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत काळ हा अभयारण्य पाहण्यासाठी उत्तम काळ मानला जातो.
• उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणवठे आटल्यामुळे, मोजक्या पाणवठ्यांच्या परिसरात तसेच चांदोली धरणाच्या परिसरात आपणास वेगवेगळ्या प्राण्यांचे दर्शन घडू शकते. पावसाळ्याच्या दिवसात पाणी उपलब्ध असल्यामुळे व गवत वाढल्यामुळे प्राण्यांचे निरीक्षण करणे अवघड जाते.
• अभयारण्यामध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी उपलब्ध सुविधा :
• अभयारण्य परिसरात जाण्यासाठी असणाऱ्या प्रवेश चौक्यांच्या जवळ तिकीट घर असून येथे आपणास तिकीट काढावे लागते किंवा पास घ्यावा लागतो.
• शुक्रवारपासून बुधवारपर्यंत पर्यटन चालू असते गुरुवारी येथील पर्यटन बंद करण्यात येते. पर्यटकांना भ्रमंतीसाठी अलीकडे येथे शासकीय वाहनाची सोय केली असून, या वाहनाद्वारे पर्यटकांना भ्रमंती करून आणली जाते. जागोजागी टेहळणी मनोरे बांधलेले असून ते पाण्याच्या परिसरात आहेत.
• तिकीट पास घेतल्यानंतर थोड्या अंतरावर आपणास तपासणी चौकी लागते तेथे पास दाखवून आपण पुढील प्रवास करू शकतो. पाणवठे असणाऱ्या ठिकाणी विशेषतः काही ठिकाणी भ्रमंती द्वारे आपणास येथील माहिती दिली जाते. बरोबर आपल्यासोबत एक वनरक्षक देखील असतो. तो आपणास प्रदेशातील वेगवेगळे प्राणी पक्षी वनस्पतींच्या जातींची माहिती करून देतो.
• पर्यटकांना राहण्यासाठी विशेष सोय :
• सदरचा अरण्य प्रदेश हा चार जिल्ह्यांमध्ये विभागलेला असून विशेषत त्या त्या विभागातून जवळ असणार्या ठिकाणी राहण्यासाठी उत्तम सोयी आहेत. सांगली विभागातून जेव्हा आपण या अभयारण्य परिसरात मंजूर गावाच्या जवळ येतो तेव्हा त्या परिसरात सनराइज चांदोली रिसॉर्ट आहे येथे आपली राहण्याची सोय होऊ शकते.
• अशी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली अभयारण्य विषयी माहिती sahyadri vyaghra praklpa chandoli abhayarany vishyi mahiti.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.