crossorigin='anonymous' src='https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1553308877182847'/> महाराष्ट्र किल्ले व स्थळे यांची माहिती Forts and places in maharashtra: चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti

रविवार, १३ सप्टेंबर, २०२६

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti

 चंदन वंदन किल्ला /

Chandan vandan kilyachi mahiti

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


• स्थान :

  महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात भुईंज गावाजवळ चंदन - वंदन जोड किल्ले आहेत.

• किल्ल्याकडे जाण्याचा प्रवासी मार्ग :

• महाराष्ट्रातील पुणे व मुंबई ही आंतरराष्ट्रीय स्थानके आहेत. येथून नॅशनल हायवे 4 वर असणारे सातारा शहर, येथून 24 किलोमीटर अंतरावर चंदन वंदन किल्ला आहे.

• तसेच भुईंज नावाचे शहर सातारा जिल्ह्यात नॅशनल हायवेवर आहे येथून जवळच चंदन - वंदन किल्ले आहेत.

• किल्ल्यावर पाहण्यासाठीची ठिकाणे :

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


• किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर आपल्याला नवीन बांधलेला चिरेबंदी कात्याळ पायरी मार्ग लागतो. या मार्गाने आपण पंधरा मिनिटात वरील भागात येतो. जागोजागी विश्रांतीसाठी व निरीक्षणासाठी टेहळणी मनोरे बांधलेले आहेत. इथून पुढे आपण किल्ल्याच्या डोंगराच्या वरील भागात येतो. या ठिकाणी एक छोटेसे देवीचे मंदिर आहे इथून पुढे चालत आल्यावर आपण चंदन वंदन या किल्ल्यांच्या मधोमध असणाऱ्या खिंडीत येतो. इथून पुढे एका बाजूला चंदन किल्ला व दुसरीकडे वंदन किल्ला राहतो.

• वंदन किल्ल्याकडे जाताना आपल्याला पुढे जुना मार्ग लागतो या मार्गावरील बाजूचे पायरीचे दगड निखळलेले दिसतात या वाटेने आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येतो.

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


• मुख्य प्रवेशद्वार :

 सुंदर चांगल्या स्थितीत असलेले हे द्वार असून याची बांधणी मध्ययुगीन काळातील भोज राजाच्या काळात बांधल्या गेलेल्या शैलीत आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला भक्कम बुरुज असून वरील बाजूचे काही दगड निखळलेले दिसतात. दरवाज्याच्या बुरुजात एक सुंदर गणेश शिल्प कोरलेले दिसते. गणेश देवता की विघ्नहर्ता आहे. म्हणून या देवतेची स्थापना हिंदू संस्कृतीत केली जाते. तसेच दरवाज्याच्या दोन्ही बाजूला सुंदर समृद्धीची प्रतीक असणारी कमलपुष्पे काढलेली आहेत. आतील बाजूस गेल्यावर दोन्ही बाजूला विस्तृत अशा देवड्या लागतात. या देवड्या विश्रांतीसाठी पहारेकऱ्यांना बांधलेल्या आहेत. सुंदर अशी रचना आहे.

• दुसरे द्वार भोज दरवाजा :

येथून पुढे आतील बाजूच्या पायरी मार्गाने वर चढून गेल्यावर आणखी एक दरवाजा लागतो. दुसरे द्वार भोज दरवाजा, हा किल्ला शिलाहार राजा भोजाने बांधला म्हणून या दरवाज्याला भोज राजाचे नाव दिले आहे. या दरवाज्याच्या आतील बाजूच्या देवड्या थोड्या मुजलेल्या होत्या. तसे पाहायला गेल्यास हा संपूर्ण दरवाजा मुजलेला होता. महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी येथील संपूर्ण मुजलेल्या मातीचा ढिगारा उचलून हा दरवाजा खुला केला आहे. हल्ली याची आतील बाजूने दागडूजी सुरू आहे हा ही दरवाजा सुस्थितीत असून याचे बांधकाम अजूनही भक्कम आहे.

• शिबंदी निवास ज्योत्ये :

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


 येथून पुढे वर गेल्यावर थोड्या अंतरावर आपल्याला शिबंदीतील पहारेकरांना, तसेच सैनिकांना, सैनिक राहण्यासाठी बांधलेल्या वास्तु पाहायला मिळतात. उंच जोत्यावर बांधलेली ही वास्तु अत्यंत सुंदर अशी असून एखाद्या वाड्यासारखी आहे. यामध्ये जागोजागी कपाटे व देवळ्या खोदून तयार केलेल्या आहेत. येथे सैनिक मावळे विश्रांती घेत असत. गप्पा करत असत.



• चुना घाणी :

 येथून पुढे वरील बाजूस चढून गेल्यावर आपल्याला चुना घाणी लागते. ही चुना घाणी म्हणजे किल्ल्यावरील बांधकाम करण्यासाठी लागणारा चुना बनवण्यासाठी तयार केली होती. या घाणीमध्ये चुनखडी राळ डिंक, हिरडीचा पाला यासारखे पदार्थ घालून, दोन दगड सांधण्याचा चुना बनवला जाई. व त्याद्वारे बांधकामाचे दगड एकमेकात सांधले जात.

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


• वाडे व इमारती अवशेष :

 येथून पुढे गेल्यानंतर अनेक वाडे व इमारतीचे पडलेले अवशेष पाहायला मिळतात. आपल्याला या अवशेषावरून तत्कालीन बांधकामाची कल्पना येते.

• वंदनेश्वर मंदिर :

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


 वंदनेश्वर मंदिर या अवशेषापासून वरील भागामध्ये चालत गेल्यावर भग्न पायरी मार्ग दिसतो. तेथून पुढे वरील भागामध्ये एक पत्र्याचे शेड मारलेली दिसते. त्या ठिकाणी बांधकामाच्या अवशेषात आपल्याला सुंदर अशी महादेव पिंडी पाहायला मिळते. बाजूला बांधकाम अवशेष दिसून राहिलेले आहेत. जवळच त्रिशूल रोवलेले दिसते. आजूबाजूच्या अवशेषावरून मंदिर बांधणीची संकल्पना दिसते.

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


• वास्तु , सदर अवशेष :

 येथून पुढे गेल्यावर वरील बाजूमध्ये अनेक शिबंदीतील मावळे, सरदार यांना बांधलेल्या निवासी वास्तूचे अवशेष दिसतात. तसेच सदरेचे अवशेष दिसतात.

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


• दारूगोळा कोठार व धान्य कोठार :

 तेथून पुढे वरील बाजूस गेल्यावर एक दारूगोळा कोठार लागते. आजही सुस्थितीत असलेले हे कोठार तत्कालीन बांधकामाची कल्पना देते. यामध्ये तीन भाग असून यात दारूगोळा तसेच धान्य साठवले जात असावे. छताचे बांधकाम सुस्थितीत असून ते दगडाच्या साह्याने त्रिकोणाकृती करत छत निर्मिती केलेली दिसते.

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


• समाधी चौथरे :

 तिथून पुढे गेल्यावर, आपल्याला काही समाधी अथवा चौथर्यांचे अवशेष पाहायला मिळतात. तत्कालीन सरदारांची व किल्ल्यावरील मुख्य व्यक्तींची ती थडगी असावीत.

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


• चौकोनी टाके :

किल्ल्याच्या वरील भागामध्ये आपल्याला एक कमानी दरवाजा दिसतो त्या दरवाज्यातून आत गेल्यानंतर आपल्याला एक चौकोनी खोदून तयार केलेले एक तलावासारखे पाणी टाके पाहायला मिळते. यामध्ये बारमाही पाणी असते. हे टाके खोदून यातील दगड काढले गेले. व ते बांधकामासाठी वापरले गेले. तसेच पाण्याच्या उतरणीला बांधल्यामुळे येथे पाणी साठत असे तसेच या परिसरात असणाऱ्या जीवंत झर्याचे पाणी यामध्ये येते. भर उन्हात सुद्धा हे तळे पाण्याने भरलेले दिसते. गडावरी तत्कालीन शिबंदीची पाण्याची गरज भागवण्यासाठी या तळ्याचा वापर होत असे.

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


• ध्वज स्तंभ :

 किल्ल्याच्यावरील भागात बाले किल्ल्यावर एक ध्वजस्तंभ पाहायला मिळतो. त्यावर भगवा ध्वज फडकत आहे. जो हिंदू धर्माचे प्रतिक आहे.

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


• चंदन किल्ला :

खिंडीतून वर आल्यावर दुसऱ्या बाजूस जाताना वंदनगडाला एक फाटा दिसतो या फाट्याने आपण चंदनगडाकडे जातो पुढे ही वाट आपल्याला गडाच्या मुख्य दरवाजाकडे नेते तटबंदीला वळसा देऊन ही घडीव पायरी मार्गाने मुख्य दरवाजा जवळ येते.

• भग्न दरवाजा :

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


या बाजूचा हा दरवाजा भंगलेला असून छत व एका बाजूची संपूर्ण बाजू नष्ट झालेली दिसते. तसेच एका बाजूची देवडी शिल्लक आहे.

• पीर :

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


येथून पुढे जवळच एक दर्गा आहे जो मुस्लिम बांधवाच्या धार्मिकतेचे प्रतीक आहे. येथील बांधकाम पडलेले आहे.

• शीव मंदिर :

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


पुढे गडाच्या वरील भागामध्ये चढून गेल्यावर एक शिव मंदिर पाहायला मिळते हे मंदिर दगडी बांधकामात असून आतील गाभाऱ्यात दोन लिंग असणारी शिवपिंड असून बाहेर बाजूस नंदी आहे. नंदी भग्न झालेला आहे तत्कालीन आक्रमणात झालेल्या परकीय आक्रमण कार्यांनी या मंदिराची नासधूस केल्याची दिसते. येथे श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात उत्सवाला लोक जमतात.

दारूगोळा कोठार गडाच्या वडील बाजूस एक भग्न अवस्थेत असलेलं वरील छत नसलेलं तीन खोल्या असणारे दारूगोळा घोटाळा त्याच्या अवशेष पाहायला मिळतात

• बालेकिल्ला :

गडाच्या वडील बाजूस बालेकिल्ल्याकडे जाताना आपल्याला दोन्ही बाजूला दगडांची चौथरी दिसतात. या ठिकाणी जुन्या काळी एक दरवाजा असावा असे वाटते. इथून पुढे बालेकिल्लाचा भाग लागतो हा उंच जागी असलेला सपाट भाग असून या ठिकाणी बालेकिल्लाचे दोन भाग दिसून येतात.

• हजरत गौस पाक सुभानी दर्गा :

 किल्ल्याच्या वरील भागात आपल्याला एक बांधलेल्या अवस्थेत दर्गा दिसतो. हा हजरत गौस पाक सुभानी दर्गा आहे. हे मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मानले जाते. दरवर्षी येथे उरूस भरतो.


चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti

• सदर व इतर इमारती अवशेष :

गडाच्या वरील बालेकिल्ल्याच्या भागामध्ये आपल्याला बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात. हे तत्कालीन शिबंदीतील लोकांच्या राहण्यासाठी बांधलेले असावेत. तसेच या ठिकाणी एक विस्तृत चौथा असणारी जोत्याचे अवशेष असणारी वास्तू पाहायला मिळते. हे सदरेचे अवशेष आहेत.

• विहीर :

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti


तसेच किल्ल्याच्या वरील बाजूस एक पिण्याच्या पाण्याची विहीर सुद्धा आहे पण आता हल्ली ते पाणी पिण्यायोग्य नाही.

• गडाच्या भवतालची तटबंदी पडलेली असून बुरुज सुद्धा ढासळलेले आहेत.

•• चंदन वंदन किल्ल्याची ऐतिहासिक माहिती :

• इसवी सन 1191 - 92 मध्ये लिहिलेला तांब्रलेख सापडलेला आहे यावरून हा किल्ला शिलाहार राजा दुसरा भोज यांनी बांधल्याचे दिसून येते .

• शिलाहार भोजाची कारकीर्द संपल्यानंतर यादवांच्या अंमलाखाली हा किल्ला होता.

• यादवांच्या राजवटीमध्ये हा किल्ला व याचा आसपासचा प्रदेश समाविष्ट होता.

• पुढे हा किल्ला सुलतान शाही व नंतर बहामनी शासकांच्या ताब्यात आला.

• त्यानंतर हा किल्ला आदिलशाही राजवटीच्या आमलाखाली आल्याचे दिसून येते.

• पुढे अफजलखान वधा नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 साली सातारा प्रांत कब्जात घेतला. तेव्हा त्याच्या आजूबाजूचे गड जिंकून घेतले. त्यामध्ये चंदन वंदन या किल्ल्यांचा समावेश होता.

• या गडाचे पूर्वीचे नाव शूरगड व संग्रामगड असे ठेवले गेले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांची नावे बदलून चंदन-वंदन अशी ठेवली.

• इसवी सन 1789 सालापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत हा किल्ला स्वराज्यात होता.

• त्यानंतर हा किल्ला औरंगजेबाच्या अमलाखाली आला.

• इसवी सन 1707 साली औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.

• पुढे मराठा साम्राज्याच्या ऱ्हासापर्यंत हा किल्ला स्वराज्यात राहिला .

• इसवी सन १८१८ साली मराठा साम्राज्य लयास गेल्यानंतर हा किल्ला ब्रिटिश शासनाच्या अंमलाखाली गेला.

• इसवी सन 15 ऑगस्ट 1947 आली भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या अधिपत्याधित आला. सध्या येथे आपल्याला भग्न अवशेष व काही वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात पाहायला मिळतात . अशी आहे.

चंदन वंदन किल्ला /Chandan vandan kilyachi mahiti



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.

नलदुर्ग किला : इतिहास, विशेषताएँ, दर्शनीय स्थल और यात्रा जानकारी | Naldurg Fort Information in Hindi

नलदुर्ग किला : इतिहास, विशेषताएँ, दर्शनीय स्थल और यात्रा जानकारी | Naldurg Fort Information in Hindi  स्थान : नलदुर्ग किला महाराष्ट्र के धार...