भिवगड / भीमगड किल्ल्याची माहिती मराठी भाषेतBhivgad / bhimgad kilyachi mahiti marathi madhe
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात कर्जत या शहरापासून जवळच १० किलोमीटर अंतरावर भिवगड/ भीमगड आहे.
• उंची :
या किल्याची सरासरी उंची ही ७८५ फूट आहे.
• किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• मुंबई या आंतरराष्ट्रीय ठिकाणा पासून रायगड जिल्यातील कर्जत येथे आल्यावर तेथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या वदप गावाजवळ तसेच तेथून जवळ १ किलोमीटर अंतरावर असलेल्या गौरकामत गावाजवळ भिवगड/ भीमगड किल्ला आहे.
• भिवगड/ भीमगड किल्यावर पाहण्यास योग्य ठिकाणे :
स्वराज्यातील अपरिचित किल्ल्यामध्ये भिवगड/ भीमगड किल्ला ओळखला जातो. कर्जत येथून जवळ असलेल्या वदप गावी जेथून आपण ढाक भैरीला जातो. तिथून वाटेला फुटलेल्या एका वाटेने आपण भिवगडावर जाऊ शकतो. वदप गावी आल्यावर तेथून पुढे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गौरकामत गावाजवळ भिवगड आहे. वदप व गौरकामत या दोन्ही गावातून किल्यावर जाता येते. मात्र गौरकामत मार्गे जाणे सोयीचे आहे.
• चपटदान मारुती मंदीर :
गौरकामत या गावी असलेल्या मारुती मंदिराजवळ असलेल्या मैदानावर गाडी पार्क करुन किल्ल्याकडे जाऊ शकतो. येथील सुंदर मारुती मंदिरात शेंदूर लावलेली मूर्ती पहायला मिळते.
• पाणी टाके : पुढे पायरीजवळ एक पाण्याचे टाके पाहायला मिळते.
• पायरी मार्ग :
पुढे आपल्याला चढून गेल्यावर पायऱ्या लागतात. त्या भग्न झालेल्या आहेत. व आता वाटेत खडक फक्त दिसून येतात. येथून पुढे घळी जवळ येऊन पोहोचतो.
घळी चढून जाणाऱ्या पायऱ्या नष्ट झाल्याने आपल्याला चढताना कसरत करावी लागते.
• गुहा खोल्या :
घळ चढून आपण आल्यावर बाजूला कातळात दोन खोदून तयार केलेल्या गुहा दिसून येतात. या पहारेकऱ्यांना राहण्यासाठी खोदल्या असाव्यात.
यामध्ये अंतर्गत दालने पहायला मिळतात.
• वीर शिल्प :
एका गुहेच्या बाहेर आपल्याला वीराचे शिल्प पाहायला मिळते. जो घोड्यावर स्वार झालेला शस्त्र धारी योद्धा याची पूजा स्थानिक लोक करतात. बाजूस एक कातळ लेणी म्हणजेच भुयारी गुहा आहे. आतमध्ये वटवाघळे पहायला मिळतात
• भग्न दरवाजा :
• घळीत पुढे आपल्याला एके ठिकाणी असे अवशेष पाहायला मिळतात की जे एका दरवाजाचे असावेत पण आता तिथे काही शिल्लक नाही.
• कातळ पाणी टाके :
पुढे आपल्याला एक खडकात खोदलेले पाण्याचे टाके लागते. या टाक्यास भुयारी टाके. किंवा अर्चना टाके असे म्हणतात. या टाक्या मधून एक चर खोदलेली आहे. ज्यातील ज्यादा झालेले पाणी बाहेर काढण्यासाठी योजना आहे. येथील पाणी पिण्यायोग्य आहे.
पुढे वर चढून गेल्यावर आपल्याला दोन वाटा लागतात. डाव्या बाजूने पुढे गेल्यावर जोत्याचे अवशेष पाहायला मिळतात.
• चुना घाणी :
गडावर तटबंदी तसेच इतर निवासी वास्तू, सदर बांधण्यासाठी अनेक सखल भागातील दगड काढून बांधकाम करण्यासाठी सांधण्यास लागणारा चुना बनवण्याची घाणी लागते.
• पाण्याच्या टाक्या :
वरील बाजूस आणखी पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. त्यापैकी एक खांब टाके आहे. गडावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाळ्यात पावसाचे पाणी साठवण्यासाठी या टाक्या खोदल्या असाव्यात.
• बालेकिल्ला :
गडाचा उंच भाग हा बालेकिल्ल्याचा असून येथे आपल्याला अनेक वास्तूंचे ज्योती अवशेष पाहायला मिळतात. तसेच येथून सोंडाई, माथेरान, ईर्शाळगड, प्रबळगड पाहता येतो.
• भिवगडाची ऐतिहासिक माहिती :
• हा किल्ला विशेषत लष्करी मोहिमेत व व्यापारी घाट मार्गावर टेहळणी करण्यासाठी बांधलेला किल्ला आहे.
• सातवाहन, शिलाहार, राष्ट्रकुट, यादव या हिंदू तसेच बहामनी, निजामशाही, मुघल, या इस्लामी राजवटीत व पुढे शिवरायांच्या स्वराज्यात हा किल्ला होता.
• पुढे पेशवाई अस्तानंतर हा किल्ला ब्रिटिश सत्तेच्या ताब्यात हा किल्ला गेला.
• इसवी सन १८१८ साली इतर किल्ल्याप्रमाणे हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतल्यावर चढणीचा पायरी मार्ग फोडून काढला. कारण पुन्हा मराठ्यांनी विद्रोह करू नये यासाठी.
• अशी आहे भिवगड / भीमगड किल्याची माहिती मराठी भाषेत Bhivgad / bhimgad kilyachi mahiti marathi madhe










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.