वसंतगड किल्ला माहिती मराठी/ vasantgad killyachi mahiti marathi madhe
• स्थान :
• महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील तळेबीड गावाजवळ वसंतगड आहे.
• उंची : ३१०० फूट उंचीवर हा किल्ला आहे.
• वसंतगड पहायला जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• मुंबई येथून नॅशनल हायवे ४ ने पुणे – सातारा – उंब्रज – तळेबिड येथून पायी वसंतगड येथे जाता येते.
• गोवा – कोल्हापूर – कराड मार्गे तळेबीड येथून गडावर जाता येते.
• पुणे, कोल्हापूर ही जवळील रेल्वे व विमानसेवा असणारी वाहतूक केंद्रे आहेत.
• वसंतगड येथे पाहण्यायोग्य ठिकाणे :
• तळेबिड गावी आल्यावर तेथे आपल्याला मराठी स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी पहायला मिळते. तिचे दर्शन घेऊन आपण शाळेजवळ आल्यावर तेथून एक रानवाट गडाकडे जाते.
• पायरी मार्ग :
थोड्या अंतरावर पायरी मार्ग लागतो. तो काही ठिकाणी तुटलेला होता. त्याची हल्ली दुरुस्ती केलेली आहे.त्या शेजारून पायवाट गडाकडे जाणाऱ्या लोकांनी केलेली आहे. या वाटेने आपण डोंगर चढून वर गडाकडे जाऊ शकतो. तसेच पायरी मार्गाने ही गडावर जाऊ शकतो.
पुढे काही अंतर चढून गेल्यावर पायरी मार्ग संपतो. व गडाची चढाई वाट लागते. खूप चालून आपण कातळ पायरी मार्गाजवळ येतो.
• गणेश मंदिर :
आपल्याला पुढे गणेश मंदिर लागते. छोटेसे गणेश मंदिर आतमध्ये सुरेख गणपती या विघ्नहर्ता देवाची मूर्ती पहायला मिळते.
• बुरुज व कात्याळ पायरी मार्ग :
पुढे आपल्याला खोदून खडकात केलेला पायरी मार्ग लागतो. त्या शेजारी बुरुज देखील आहे. या वाटेने आपण उजवीकडे चढून वळून गडाच्या वरील भागात येतो.
• अर्धवट बुरुज व हनुमंत मंदिर :
पुढे काळाच्या ओघात नष्ट होत चाललेला बुरुज दिसून येतो. हा टेहळणी करण्यासाठी बांधला असावा. तेथून थोड्या अंतरावर हनुमंत देवतेच मंदिर आहे. हनुमंत ही वीर संकट मोचन देवता. तिची पूजा केल्याने शत्रूशी सामना करण्यासाठी बळ येते. म्हणून बलोपासना करण्यासाठी प्रत्येक किल्यावर हनुमंत मंदिर पाहायला मिळते. तसेच येथून जवळच गणेश मंदिर देखील आहे. संकट हरणारी देवता म्हणून पूजनीय आहे.
• विहीर :
जेव्हा आपण गड माथ्यावर येतो. तेव्हा तिथे आपल्याला एक पाण्याची गडावर राहणार्यांची गरज भागवण्यासाठी विहीर खोदलेली पहायला मिळते.
• कोयना तळे :
गडावर पाण्याचे तळे देखील आहे. पुढे उन्हाळ्यात देखील पाणी असते. शिबंदीतील मावळ्यांची पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी ही तळी व विहिर तयार गडावर केली गेली. यास कोयना तळे म्हंटले जाते. तसेच आणखी जागोजागी एक दोन लहान तळी पहायला मिळतात.
• पाणी टाके :
किल्यावर आपल्याला पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. खोदून तयार केलेली ही टाकी त्यातील दगड बांधकामास वापरले गेले.
• तटबंदी :
तळेबीड गावाच्या बाजूला असणारी तटबंदी भग्न झालेली आहे. बाकीच्या ठिकाणी ती सुस्थितीत आहे. तिच्यामध्ये जागोजागी जंग्या व फांज्या केलेल्या आहेत.
• जंगी :
तटबंदीत केलेली बाण अथवा बंदुकीने शत्रूला मारण्यासाठी केलेली पारदर्शक चौकोनी देवळी.
• फांज्या :
तोफेचा मारा करण्यासाठी केलेली तटबंदी अथवा बुरुजातील पारदर्शक देवळी.
• तटबंदी शेजारून गडाच्या सभोवती रसद युद्ध काळात वेगाने पोहोच करता तसेच टेहळणी करण्यासाठी विस्तृत वाट पाहायला मिळते.
• शौचालय कूप :
तटबंदी मध्ये जागोजागी शौचालय कूप बांधलेले पहायला मिळतात. शिबंदीतील मावळ्यांच्या सोयीसाठी त्यांची निर्मिती केली आहे. यावरून त्याकाळात देखील उघड्यावर शौच केला जात नसे. हे समजते.
• बुरुज :
गडावर जागोजागी बुरुज पहायला मिळतात. पूर्व बाजूचा बुरुज थोडा ढासळलेला आहे. दक्षिण, पश्चिम व उत्तर बुरुज बरेचशे सुस्थितीत आहेत. बुरुजामध्ये जंग्या व फांज्या खोदलेल्या पहायला मिळतात. बुरुजावर चढून जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. वरून उभे राहून उत्कृष्ट टेहळणी करता येते. सभोवतीच्या परिसरावर लक्ष राहते. व शत्रू हालचाल ही टिपता येत असे. किल्याच्या कमकुवत भागाजवळ बुरुज बांधले जात असत. पश्चिमेचा बुरुज अतिशय अजस्त्र आहे.
• पश्चिम दरवाजा :
गडाचा पश्चिम दरवाजा सुस्थितीत असून त्याची बांधणी गोमुख प्रकारची आहे. गोमुख म्हणजे गाय आपले शरीर चाटताना मागे वळते अशी रचना. यामुळे गडाचा दरवाजा शत्रूस कधी दिसत नाही. व त्यावर थेट कोणताही तोफगोळा किंवा सैन्य हल्ला करता येत नाही. गडाचे प्रवेशद्वार सुस्थितीत असून, चौकटीवर हनुमंताची मूर्ती कोरलेली आहे. तसेच बाजूच्या तटबंदी व बुरुजाची थोडी दुरुस्ती केली असल्याचे दिसून येते.
• समाधी :
गडावर काही समाधी अवशेष पाहायला मिळतात. यामध्ये विष्णू पद व शैव शिल्प आहेत. यावरून या लढावू मावळे तसेच कारभारी ब्राह्मण व प्रभू, कारखानीस अधिकारी यांच्या असल्याचे समजते. अशा अनेक समाधी दिसतात.
• कचेरी व वास्तू अवशेष :
गडावर काही ठिकाणी आपल्याला बांधकाम वास्तू तसेच कचेरी म्हणजे सदरेचे ज्योती अवशेष पाहायला मिळतात. यावरून तत्कालीन गडावरील आर्थिक कामकाज कसे होते हे समजते. व गडावर असणारी शिबंदी व राबता समजतो.
• चंद्रसेन महाराज मंदिर :
गडावर आपल्याला एक मंदिर पाहायला मिळते. ते चंद्रसेन महाराज यांचे आहे. या मंदिराचा व महाराज यांचा संबंध रामायण काळाशी जोडला जातो. यावरून हे स्थळ रामायण म्हणजे त्रेतायुगात देखील प्रसिद्ध होते. मंदिराच्या आत निरनिराळ्या हिंदू देवतांच्या मूर्ती पूजास्थानी पहायला मिळतात. चैत्र महिन्यात येथे यात्रा भरते. चंद्रसेन हा श्रूपणकेचा मुलगा. लक्ष्मणाने त्याचे हात कापले. त्यास वरदान दिले. त्याचे हे मंदिर आहे. मंदिरात हनुमंत, चंद्रसेन महाराज, गणेश, विठ्ठल रुक्मिणी अशा अनेक देवी देवतांच्या मूर्ती आहेत. बाहेर दीपमाळ असून त्याजवळ वीरगळी पहायला मिळतात.
• महादेव मंदिर :
गडावर एक महादेव मंदिर आहे. बाहेरील भागाची पडझड झाली असली तरी गाभारा सुरक्षित आहे. गाभाऱ्यात शिवपिंड आहे. बाहेर भग्न नंदी पाहायला मिळतो.
• वसंतगड किल्याच्या विषयी ऐतिहासिक माहिती :
• चंद्रसेन महाराज यांच्या मंदिराचा उल्लेख रामायण काळाशी जोडला जातो. चंद्रसेन हा श्रूपणकेचा मुलगा. व रावणाचा भाचा त्याचे हात कलम लक्ष्मणाने केले. त्यास पुढे वरदान दिले. अनेक लोक तुझी पूजा करतील. व तू लोकांचे कल्याण करशील. हे एक हिंदू धर्मीय लोकांचे पूजनीय स्थान आहे.
• इसवी सनाच्या १२ व्या शतकात शिलाहार राजा भोज याने हा किल्ला बांधला.
• अफजल खान वधानंतर इसवी सन १६५९ साली स्वराज्यात छत्रपती शिवराय यांनी हा किल्ला जिंकून घेतला.
• आदिलशहा कारभारी जहागिरदार मसुरचे महादजी जगदाळे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. त्याने अफजलखान स्वारीच्या वेळी शिवरायांविरुद्ध अफजलखानास मदत केली. अफजलखान वध केल्यावर शिवरायांनी त्याला तळेबीड येथे गाठून त्यास वसंतगडी पकडून आणून शिरच्छेद केला.
• स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते हे या गडाच्या पायथ्याशी असलेल्या तळेबीड गावचे रहिवासी होते. त्यांची कन्या महाराणी ताराबाई यांचे या परिसरातच त्यांचे बालपण गेले.
• दक्षिणेतून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांचे वास्तव्य या गडावर काही काळ होते.
• छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर हा किल्ला १६९९ साली औरंगजेब बादशहाने आपल्या ताब्यात जिंकून घेतला.
• इसवी सन १७०७ साली औरंगजेब मृत्यू झाल्यानंतर हा किल्ला पुनः मराठी साम्राज्यात जिंकून घेतला.
• वारणा तह झाल्यानंतर हा किल्ला राजश्री शाहू राजे सातारा गादीकडे हा किल्ला आला.
• पुढे इसवी सन १८१८ साली मराठा साम्राज्य लयास गेल्यावर इंग्रजी सत्तेच्या अंमलाखाली हा किल्ला गेला.
• पुढे १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
अशी आहे वसंतगड किल्याची ऐतिहासिक माहिती Vasantgad killyachi mahiti marathi madhe


























कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.