केंजळगड किल्ला/ kenjalgad killa
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातील भोर तालुका व सातारा जिल्यातील वाई तालुक्याच्या सीमेवर केंजळगड किल्ला आहे.
• उंची :
हा किल्ला समुद्र सपाटी पासून सरासरी ४२६९ फूट उंचीवर आहे.
• किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• पुणे येथून भोर येथे आल्यावर तेथून रायरेश्वर रोड मार्गे आंबवडे – कोर्ले मार्गे पाखरेवाडी गावी आल्यावर आपण केंजळगड किल्ल्यावर जाऊ शकतो.
• सातारा येथून वाई येथून पुढे मेणवली येथून घेरा केंजळ मार्गे आपण केंजळगड किल्ल्यावर पायी ट्रेक करत गडावर जाऊ शकतो.
• केंजळगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
• भोर मार्गे आपण रायरेश्वर पठार रोड मार्गे पुढे आल्यावर आपल्याला केजळगड फाटा लागतो. या वाटेने आपण पाखरेवाडी गावी येतो. या ठिकाणी आपली गाडी पार्क करुन. शाळेच्या जवळून असलेल्या झाडी वाटेने आपण केंजळगड किल्ल्यावर जाऊ शकतो. खूप चालून आपण गडाजवळील डोंगर माथ्यावर येतो.
• पहारा चौकी व घोड टाके :
गड प्रवेश करण्यापूर्वी येथे प्रथम पहारा चौकी लागते. या चौकीचे आता भग्न अवशेष पाहायला मिळतात. शेजारी खडकात खोदलेले चौकोनी पाणी टाके जे घोड्यांना पाणी पाजण्यासाठी खोदले गेले आहे. ते पहायला मिळते. स्वारी करुन आलेले शिलेदार, बारगीर या ठिकाणी घोड्यांना चौकात पाणी टाकून पाजत असत. येथे शेजारी खुंटी खडकात खोदलेली दिसून येते.
• प्रवेशद्वार :
• पुढे थोडे चालून गेल्यावर गडाचा प्रथम दरवाजा लागतो. एका बाजूची चौकट अवशेष व पहारेकरी यांना विश्रांतीसाठी खोदलेली देवडी शिल्लक आहे. दुसरी बाजू व वरील चौकट ढासळलेली आहे. राहिलेल्या अवशेषांवरून तिचे मध्ययुगीन काळातील वैभव जाणवते.
• गुहा भुयार :
तेथून थोड पुढे चालून गेल्यावर आपल्याला एक भुयार लागते. हल्ली गडप्रेमी फिरायला आल्यावर येथे जेवण बनवण्यासाठी याचा वापर करतात. विश्रांतीसाठी किंवा गुप्त भुयार या ठिकाणी असावे. काळाच्या ओघात दुर्लक्ष झाल्याने आतून मुजले गेले आहे. पावसाळी व हिवाळी ऋतूत येथे रानटी प्राणी, मधाची पोळी तसेच कोळी किडे वास्तव्य करतात. येथील आतील भागात थोडे जपून वावरावे लागते.
• बुरुज :
तेथून पुढे लागतो. तो भग्न झालेला आहे. त्याचे विखुरलेले दगड इकडे तिकडे पडलेले दिसून येतात.
• कात्याळ पायरी मार्ग :
कडा खोदून वर गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग निर्माण केलेला आहे. ज्यामध्ये एक सुद्धा सांधा दिसून येत नाही.
• दुसरे प्रवेशद्वार :
पायरी वाटेने पुढे आल्यावर पुढील प्रवेशद्वार लागते. ते भग्न झालेले आहे. खालील उंबरा फक्त शिल्लक आहे. त्याखाली पाणी जाण्यासाठी छिद्र पहायला मिळते. वरील बाजूच्या पायऱ्या पावसाळी पाण्याच्या प्रवाहांनी निखळल्या आहेत.
• गडाची तटबंदी :
गडाची तटबंदी बऱ्याच ठिकाणी पडलेली आहे. काही ठिकाणी ती सुस्थितीत आहे. विशेषत हा गड उंच प्रस्तर दगडावर आहे. चारी बाजूला उंच कडा आहे.
• पाणी झरा व पाण्याची टाकी :
थोडं पुढे गेल्यावर आपल्याला एक झरा दिसतो. गडाच्या वरून पाणी पाझरून ते सखल भागातील पाण्याच्या टाक्यात येते. हिवाळ्यात अखेरीस ते आटते. पण येथील पाणी गडावरील रहिवाश्यांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी वापरले जाई.
• पाण्याचे टाके :
गडावर एक मोठे पाण्याचे टाके पाहायला मिळते. ते खोदून तयार केलेले आहे. उन्हाळ्यात त्यात अल्प पाणी पहायला मिळते.
• कोठार :
गडावर एक बांधलेले कोठार आहे. वरील छत पडले आहे. खालील भाग शिवकाळात बांधलेला असून वरील भाजीविटेचे बांधकाम हे पेशवाई काळात बांधले असावे. हे एक धान्य अथवा दारूगोळा कोठार असावे.
• चुना घाणी :
गडावर दोन चुना घाणी पहायला मिळतात. गड बांधकाम करताना दोन दगड सांधताना चुना वापरला जात असे. चुनखडी हिरडीचा पाला, डिंक, राळ, गुळ घालून गोल खळ्यात टाकून त्यावरून दगडी चक्र बैल किंवा घोडा यांना जुंपून फिरवून सांधण्याचा पदार्थ बनवून दगड भक्कम सांधले जात. व बांधकाम पक्के केले जाई. अशा दोन घाणी गडावर पहायला मिळतात.
•सदर अवशेष :
गडाच्या वरील वास्तू नामशेष झालेल्या आहेत. वाड्याचे तसेच सदरेचे अवशेष पाहायला मिळतात. सदरेचे ज्योती अवशेष पाहायला मिळतात. गडावर व परिसरातील व्यवहार या सदरेतून पहिला जात असे.
• वाड्याचे अवशेष :
गडावर अनेक ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. गडावरील किल्लेदार, सबनीस, कारखानीस तसेच पहारा मावळे यांसाठी बांधलेल्या वास्तूंचे हे अवशेष पाहायला मिळतात. शिवकाळात गडाच्या बाह्य बाजूचे बांधकाम हे कठीण असे. मात्र आतील वास्तू या कमी खर्चात बांधल्या जात. विशेषत दगड, माती, लाकूड वापरले जाई. त्यामुळे गडाचे दरवाजे, तटबंदी, बुरुज अत्यंत कठीण व अभेद्य असत. व आतील वास्तू या भग्न मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत.
• कारंजाई देवी मंदिर :
गडावर भग्न अवस्थेत एक मंदिर होते. ही गड देवता कारंजाई देवी. काळाच्या ओघात दुर्लक्ष झाल्याने यास अवकळा आली होती. हल्ली येथे मंदिर बांधणी चालू आहे. मंदिरात देवी व अन्य हिंदू देवता मूर्ती पहायला मिळतात. येथील दिपज्योती दीपक हे दगडी बनवलेले आहेत. या देवीच्या नावावरून केलंजागड असे म्हटले जाई.
• या किल्ल्यास केंजळगड, केलंजा, केरंजाई गड तसेच येथील परिसर पाहून मनोहरगड हे नाव देखील शिवरायांनी या किल्ल्याचे ठेवले होते.
• या गडावरून आपल्याला महाबळेश्वर, नीरा देवधर धरण, धोम धरण, सिंहगड, वैराटगड, वज्रगड, रोहिडा, लिंगाणा, राजगड,रायगड, पांडवगड, पुरंदर, तोरणा, कोलेश्वर, कमळगड रायरेश्वर पठार, नवरानवरी डोंगर, वरंधा घाट आपल्याला पाहता येतो.
• केंजळगड किल्याची ऐतिहासिक माहिती :
• या किल्लावर पूर्वीपासून केरंजाई देवीचे मंदिर आहे. ती गडस्वामीनी देवता आहे.
• मावळातील सर्व गड तसेच केंजळगड हा किल्ला देखील इसवी सनाच्या बाराव्या शतकात शिलाहार राजा भोज याने हा किल्ला बांधला.
• पुढे हा किल्ला यादवांच्या ताब्यात होता.
• यादव सत्तेचा अस्त झाल्यावर हा किल्ला सुलतानशाही व पुढे बहामनी सत्तेच्या ताब्यात गेला.
• बहामनी सत्तेचे विभाजन झाल्यावर हा किल्ला आदिलशाहीत आला. तो इसवी सन १६७४ पर्यंत हा किल्ला आदिलशाहीत होता.
• इसवी सन १६७४ साली चिपळूण मोहिमेवर असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले सैन्य हा किल्ला घेण्यास पाठवले. या मोहिमेचे नेतृत्व गंगाजी विश्वासराव किर्दत यांनी केले. या लढाईंत त्यांना वीरमरण आले. किल्ला २४ एप्रिल १६७४ साली स्वराज्यात दाखल झाला.
• पुढे संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर हा किल्ला औरंगजेब बादशहाने इसवी सन १७०१ साली जिंकून मुघलांच्या ताब्यात घेतला.
• इसवी सन १७०२ साली हा किल्ला पुनः स्वराज्यात सरदार पिलाजी गोळे यांनी जिंकून घेतला.
• सरदार पिलाजी गोळे या किल्ल्याचा कारभार पाहू लागले.
• पुढे पेशवाई काळात थोडेफार बांधकाम झाले. विशेषत कोठार व अन्य वास्तू बांधल्या गेल्या.
• इसवी सन १८१८ साली ब्रिटिश सरकारने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यास जाणवले की हा किल्ला योग्य नियोजन करून लढवल्यास किल्ला जिंकणे अशक्य आहे. व त्यांनी बऱ्याच वास्तूंची नासधूस केली. कारण मराठे पुन्हा गड ताब्यात घेतील अशी भीती होती.
• इसवी सन १५ ऑगस्ट १९४७ नंतर हा किल्ला भारत स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
• गडावर राहण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही. पायथ्याशी गाव आहे. तेथे होऊ शकते. किंवा स्वतः टेन्ट बांधून करू शकतो.
• जेवणाची सोय : स्वतः जेवण करुन खावे लागेल.
• पिण्याचे पाणी : गडावर पाण्याची टाकी आहेत. पण अशुद्ध पाणी शुद्ध करून वापरात घेऊ शकता. विशेषत पावसाळा व हिवाळ्यात सोय होते. खालील गावात होऊ शकते.
• अशी आहे केंजळगड किल्याची माहिती.kenjalgad kilyachi mahiti


















कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.