अलंग / अलंगगड किल्ल्याची माहिती
Alang kilyachi mahiti marathi madhe
स्थान :
महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या उत्तर सह्याद्री पर्वताच्या पश्चिम बाजूस असणाऱ्या कळसूबाई शिखराच्या डोंगर रांगेत अलंग, मदनगड व कुलंग हे किल्ले आपणास पाहायला मिळतात.
यामध्ये असणारा अलंग हा एक किल्ला आहे.
• उंची : सुमारे 1479 मीटर (4852 फूट) समुद्रसपाटीपासून आहे. पर्वतरांग: सह्याद्री
जिल्हा: नाशिक
जवळची गावे: आंबेवाडी, घोटी
• किल्यावर जाण्यासाठी वाहतूक मार्ग :
• अलंग किल्ल्याजवळ पायथ्याशी आंबेवाडी हे गाव आहे.
• आंबेवाडी हे गाव नाशिक शहरापासून ५५ किलोमिटर अंतरावर आहे.
• नाशिक – इगतपुरी – आंबेवाडी – या ठिकाणाहून पायी ट्रेक करत गडावर जाता येते.
• आंबेवाडी हे ठिकाण पुण्यापासून १८२ किलोमीटर अंतरावर आहे.
• मुंबई पासून १४० किलोमीटर अंतरावर आहे.
• सूरत या गुजरात राज्यातील ठिकाणापासून ३०० किलोमीटर अंतरावर आहे.
• मुंबई, पुणे, नाशिक, सुरत ही भारत देशातील मुख्य शहरे असून ती जमीन व हवाई मार्गाने राज्यातील इतर भागांशी तसेच आंतरराष्ट्रीय प्रदेशांना जोडली गेलेली आहेत. याठिकाणी रस्ते व लोहमार्गाचे जाळे दिसून येते.
• आंबेवाडी पर्यंत पोहोचण्याचा उत्तम मार्ग हा रस्ते मार्ग आहे.
• अलंग किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
• नाशिक मार्गे इगतपुरीहून आपणास आंबेवाडी मार्गे गडाच्या पायथ्याला असणाऱ्या परिसरात येता येते. या ठिकाणी आल्यावर गुगल म्यापद्वारे आपण जंगलातून मार्गक्रमण करत किल्याच्या परिसरात येतो. येताना प्रथम आंबेवाडी गाव लागते. तेथून गडाकडे येताना पायी कच्च्या रस्त्याने दोन्ही बाजूला दगडी बांध रचलेले आहेत. या वाटेने आपण जंगलात येतो.
• खडतर जंगली पायी ट्रेक :
किल्याच्या परिसरात जंगली माळभाग परिसर लागतो. येथील विरळ जंगल प्रदेशात पायवाटेने उंच सखल टेक चढत आपण गडाच्या दिशेने चालत जाऊ शकतो. वाटेत पावसाळी पाण्याने निर्माण झालेल्या घळ वाटेने आपण खिंडीच्या परिसरात येतो. येताना वाटेत पाण्याचा ओढा लागतो. येथील जंगलात आंबा, उंबर, जांभूळ, कटकी, बिब्बा, हिरडा, बेहडा, आवळा तसच अन्य रानमेवा असणारी करवंदे, कटकी, चांगुणी, तोरणे, बोरे अशा व काटेरी झुडपे ही आढळतात. सापा मध्ये विषारी गणला गेलेला फुरसे हा साप देखील येथे आढळतो. माकडे , बिबट्या सारखे प्राणी देखील येथे जंगलात आहेत.
जंगल वाटेने जाताना दोन फाटे फुटतात डावा फाटा हा धबधब्याकडे जातो. तर उजवा अलंग किल्ल्याकडे असणाऱ्या खिंडीत जातो.
• पाण्याचा ओढा :
जंगलमार्गे चालत गेल्यावर आपणास जंगलातून वरील भागातून आलेला एक ओढा पाहायला मिळतो या ओढ्याला पावसाळी दिवसात भरपूर पाणी असते. उन्हाळी दिवसात पाणवठे आटू लागतात. येथील सर्व सजीव प्राणी, पक्षी व वनस्पतींची आवश्यक पाण्याची गरज येथूनच पूर्ण होते.
• खिंड कात्याळ शिल्प :
जंगली अरण्यातून अनेक उंचवटे पार करत आपण गडाच्या उंच कात्याळ कड्याजवळ येतो. तेथून
पायी चालत आपण गडाच्या पायथ्याशी येतो तिथे कात्याळ शिल्पे आहेत. ही शिल्पे शिकार करणाऱ्या आदिम माणसाची आहेत. शस्त्र हाती घेऊन तो लढत आहे. असे हे शिल्प येथे किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे. अलंग, मदनगड व कुलंग असे या किल्ल्यांची नावे आहेत. कातळ शिल्पाच्या निशाणी द्वारे अंदाज बांधून पूर्व बाजूस मदनगडाच्या पूर्व बाजूस असणाऱ्या आपण अलंग गडाकडे जातो. या वाटेने आपण कात्याळ प्रस्तर असलेल्या गडाच्या चढणीच्या वाटेला लागतो.
• कठीण कात्याळ चढ व पायरी मार्ग :
येथून ट्रेक खूप अवघड होत जातो. थोडे चढून गेल्यावर आपणास कात्याळ पायरी मार्ग लागतो. जो कड्यामध्ये कड्यात जागोजागी खोदून तयार केल्याचे दिसून येतो. या पायऱ्यांच्या रचना पाहता पाणी न थांबता निचरून जाण्याची रचना दिसते. या मार्गाने आपण गडावर चढून जाऊ शकतो. येथून आपण एका गुहेच्या जवळ येतो.
• गुहा :
गडाच्या वाटेवर आपणास खडकात खोदलेली गुहा लागते. गिर्यारोहक व पर्यटक येथे थोडी विश्रांती घेतात. व पुढे मार्गस्थ होतात.
India fort
• तुटलेला पायरीमार्ग कडा :
गुहेतून बाहेर पडल्यावर कात्याळ प्रस्तर चढून आपण वरील बाजूस येतो. येथे खडा कातळ कडा दिसतो. जो ९०°कोनात आहे. येथे पूर्वी पायरी मार्ग होता. ब्रिटिश राजवटीत येथील पायरी मार्ग तोफगोळ्याच्या माऱ्याने तोडून टाकला गेला. कारण मराठे पुन्हा गडाचा वापर करून ब्रिटिश सत्तेला आव्हान करतील. येथे चढताना गिर्यारोहक आवश्यक आहे. जो कडा चढून वर दोर बांधेल व आपण वर चढून जाऊ शकू. दोराने वर गेल्यावर वरील बाजूस लहान अरुंद पायरी मार्ग लागतो.
• लहान अरुंद पायरी मार्ग :
. या मार्गाने वर पायरी चढून जाताना आसणाऱ्या पायरीतील खोबणीच्या मदतीने चढून जावे लागते. यासाठी गिर्यारोहण व उंच कठीण जागी चढणे व उतरणे सराव हवा. सर्व सामान्य लोकांचे काम नाही. खाली खोल दरी , जरा हात जरी निसटला तरी खाली खोल दरीत पडण्याची भीती वाटते. या खड्या वाटेने प्रस्तर रोहन करुन आपण गडावर येऊन पोहोचतो.
• विस्तृत नालाकृत पठार व खडे कडे :
गडाची रचना अर्ध नालाकृती असून एकीकडे चढ उतार असणारे हे पठार आहे. उंच तासीव कडा असून यांनी निसर्गनिर्मित तटबंदी तयार झाली आहे.
• दोन पाणी टाक्या :
वर चढून आल्यावर आपणास दोन पाण्याच्या टाक्या लागतात. ज्या गडावरील पाण्याच्या सोईसाठी खोदलेल्या दिसून येतात.
• शिव मंदिर :
गडाच्या उंच खडकातील दगडे काढून येथे बांधलेले एक छोटेसे मंदिर अवशेष पाहायला मिळते. ज्याच्या वरील भाग नष्ट झाला असून कमरेइतका भाग शिल्लक आहे. आत भग्न शिवलिंग पहायला मिळते.
• कात्याळ खोदीव गुहा लायन निवास :
गडाच्या वरील बाजूला उंच टेक खोदून आतील दगड काढून अंतर्गत खोल्यांची रचना करण्यात आली असून. गडावर राहणाऱ्या शिबंदीतील सैनिकांना राहण्यासाठी या खोल्या असणाऱ्या दोन विस्तृत गुहा निर्माण केल्या आहेत. यांची रचना पाहता. धान्य, निवास, शस्त्र साठा आणि इतर विश्रांतीसाठी या खूप विचारपूर्वक बांधल्याचे दिसते.
• पाण्याची टाकी :
गुहा खोली पाहून त्याच्या शेजारील पायवाटेने चढ चढून पलीकडे गेल्यावर गडाच्या उतार भागात मध्यभागी सलग पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. या टाक्या खोदताना आतील भागातील दगड काढून त्याद्वारे गडावरील वास्तू बांधल्या गेल्या. व येथे पाण्याच्या टाक्या निर्मिती केली गेली. जेथे पावसाळी ऋतूत पडलेल्या पावसाचे पाणी साठून गडावरील लोकांच्या पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची सोय केली गेली. सलग्न टाक्यातील पाणी वहन क्षमता लक्षात घेऊन. पाणी शेवटच्या टाकीपर्यंत येईपर्यंत स्वच्छ होत असे.
• वाडा अवशेष :
गडावर खोदलेल्या टाक्यातील दगड काढून उंच भागात एक वाडा बांधला होता. सदर वाड्याची काळाच्या ओघात दुर्लक्ष झाले असल्यामुळे पडझड झाली असल्याचे दिसून येते. आता फक्त एक भिंत शिल्लक आहे. राहिलेल्या बांधकामातून तत्कालीन वास्तूची व वास्तुशास्त्रची कल्पना येते.
• वरील वास्तू सोडल्या तर येथे पाहण्यास असे जास्त काही शिल्लक नाही. फक्त विस्तृत पठार आहे. जेथे उभे राहून आपण अलंग गडाशेजारील परिसर पाहू शकतो. गडाच्या पूर्व बाजूस कळसुबाई, वितंडगड, औसाचा किल्ला , उत्तरेस हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी आहे. दक्षिणेस आजोबागड, खुट्टा सुळका , हरिश्चंद्रगड, रतनगड दिसतो.
• अलंग किल्याची ऐतिहासिक माहिती :
• अलंग या किल्याची निर्मिती यादव राजवटीत झाली असावी असे मानले जाते कुलंग आणि अलंग या किल्ल्यांच्या जोडगोळी असलेल्या किल्याचा व्यापारी मार्गावर टेहळणी करण्यासाठी व स्थानिक परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वी या ठिकाणी किल्ल्यांची उभारणी केली असावी. असे येथील स्थानिक लोकांच्या बोलचालीत मिथकातून म्हटले जाते.
• इसवी सनाच्या ९ते ११ या काळात हा डोंगर यादव घराण्याच्या राजवटीत दाखल झाला. याचे भौगोलिक स्थान लक्षात घेता. टेहळणी व परिसर सुरक्षितता या दृष्टीने विचार करून येथे टाक्या व गुहाखोली, दरवाजा अन् पायरीमार्ग विकसित करण्यात आला.
• पुढे सुलतानशाहीत मुस्लिम राजवटीत व नंतर मराठी राज्यात हा किल्ला होता
• काही काळ नाशिक विभागात असताना मुघल राजवट देखील या किल्ल्याने पाहिली आहे
• पुढे हा किल्ला स्वराज्यातील पंतप्रधान पेशवे यांच्या ताब्यात इसवी सनाच्या १७६० साली कुलंग किल्यासोबत दाखल झाला.
• त्यानंतर इसवीसन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी येथील पायरी मार्गाची मोडतोड केली. व किल्याचा दरवाजा व इतर वास्तू नष्ट केल्या. कारण पुन्हा मराठ्यांनी एकजूट होऊन आपल्या सत्तेला आव्हान देवू नये म्हणून ही प्रेरणास्थाने नष्ट केली गेली.
• इसवी सन १९४७ सालानंतर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे.
• हल्ली अनेक ट्रेकर्स A. M. K. या नावाखाली गिर्यारोहण करण्यासाठी अलंग, मदनगड व कुलंग या तीन किल्ल्यांची ट्रेकिंग करतात.
• राहण्याची सोय कशी?
• किल्याच्या परिसरात असणारे पाणवठे हे फेब्रुवारी महिन्यानंतर आठतात. तरी ट्रेकला जाणाऱ्यांनी जास्तीत जास्त ऑक्टोंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत ट्रेक करावा. पावसाळ्यात देखील ट्रेक केला जातो. मात्र काळजी घ्यावी. शेवाळ वाढून निसरट होते. त्यामुळे ऑक्टोबर ते फेब्रुवारी ट्रेक उत्तम आहे.तसेच परिसरातील अनुभवी गाईड घेणे अत्यंत चांगले.
India fort
• जेवणाच्या सोयीबाबत काय?
• जेवणाची सोय या ठिकाणी होत नाही. मात्र राहण्याची होऊ शकते. या ठिकाणी गुहा आहेत. जेवणाची सोय स्वतःच करावी लागते. फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याचे दुर्भिक्षण जाणवते. तरी देखील येथे पाणी टाक्यांची संख्या जास्त आहे.
• येथील कुंडातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पण ते प्रक्रियक लहान फिल्टर केले तर चांगले.
• अशी आहे अलंग किल्ल्याची माहिती
Alang kilyachi mahiti marathi madhe










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.