महिम किल्ला / mahim Fort
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरात असलेल्या माहीम खाडीजवळ माहीम किल्ला आहे. या ठिकाणास महिकावती या नावाने ओळखले जात असे. इंग्रज काळात माहीम या नावे ओळखले जाऊ लागले. येथे माहीम नदी पुढे जाऊन मिठी नदीस मिळते.
• माहीम किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• पश्चिम रेल्वेच्या माहिम रेल्वे स्थानकावर उतरुन आपण मोरी रोड मार्गे समुद्र किनाऱ्याकडे चालत गेल्यावर दहा मिनिटात समुद्र किनाऱ्यावर पोहोचतो. तेथे आपल्याला महिमचा किल्ला पहायला मिळतो.
• किल्यावर पाहण्यायोग्य ठिकाणे :
• भक्कम तटबंदी :
या किल्ल्यास भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीची अलीकडे डागडुजी करुन बळकटी करण्यात आलेली आहे. तटबंदीच्या आतील बाजूस आपल्याला समांतर तटावर फिरण्यासाठी वाट आहे.
• जंग्या व फांज्या :
तटबंदी मध्ये आपल्याला जागोजागी जंग्या व फांज्या पाहायला मिळतात. जंग्यांचा बंदूक अथवा धनुष्यातून बाण मारण्यासाठी वापर केला जातो.
• फांज्या : हे तटातील मोठे होल असते. ज्यातून तोफेने मारा करता येतो.
• त्रिकोणी बुरुज :
ब्रिटिश सत्तेच्या ताब्यात हा किल्ला आल्यावर किल्याच्या मजबुतीसाठी त्रिकोणी बुरुज बांधले गेले. ज्यामुळे तोफेचा मारा झाला तरी त्रिकोणी रचना असल्याने कोणताही परिणाम होत नसे. व बुरुज बळकट असल्याने किल्ला सुरक्षित राहत असे.
• प्रवेशद्वार :
किल्ल्यास बांधलेले ब्रिटिश कालीन प्रवेशद्वारे आजही सुस्थितीत असल्याचे पाहायला मिळतात. दरवाजा शेजारी नक्षीदार स्तंभ आहेत. प्रवेशद्वार आतील बाजूस देवडी असून पुढे आतमध्ये दार आहे. सध्या बाहेरून लोखंडी दरवाजे आहेत.
• विहीर :
किल्याच्या आतील बाजूला विहीर असून विहिरीत गोडे पाणी आहे.
• सागरी दरवाजा :
खाडीच्या बाजूला समुद्र प्रवेशद्वार आहे. ज्याद्वारे समुद्र मार्गे ये जा करता येत असे. तसेच संकटकाळी बाहेर जाता येत असे.
• उठावदार खांब :
• आतील बाजूस उठावदार खांब आहेत.
• पोलिस मुख्यालय व गार्डन :
किल्याच्या आवारात सुंदर बगीचा तयार केला असून. समोर विस्तृत खाडी व वांद्रे सेतू पहायला मिळतो. तसेच जवळ पोलिस मुख्यालय देखील आहे
• माहीम किल्याची ऐतिहासिक माहिती :
• महिकावती नावाच्या प्राचीन मध्ययुगीन ग्रंथात या किल्ल्याचा उल्लेख आहे.
• प्रतापराजे बिंब याने आपल्या जुन्या महिकावती राजधानीस सुरक्षेसाठी शत्रू पासून रक्षण व्हावे यासाठी या ठिकाणी महिकावती नदीच्या किनारी खाडीच्या बाजूला हा किल्ला इसवी सन ११ व्या शतकात बांधला.
• पुढे मुस्लिम आक्रमण आल्यावर गुजरातचा सुलतान याने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
• इसवी सन १५१६ मध्ये पोर्तुगीज अधिकारी टॉम होमाबे मोनो याने हा किल्ला जिंकून घेतला.
• त्यानंतर वारंवार गुजरात सुलतान अली शहा व पोर्तुगीज यात संघर्ष होत राहिला.
• इसवी सन १५३४ साली हा किल्ला संपूर्ण पोर्तुगीज सत्तेच्या अमलाखाली आला.
• इसवी सन १६६१ साली पोर्तुगीज राजकन्येचा विवाह इंग्लंडच्या चार्ल्स दुसरा याच्याशी झाला. तिला हुंडा म्हणून मुंबई बंदर दिले. त्यापासून हा किल्ला मुंबई बंदरासोबत इंग्रजी सत्तेच्या अमलाखाली आला.
• इंग्रज स्थापत्य विशारद जेरॉल्ड ऑगियर याने या किल्याची तटबंदी मजबूत केली. तसेच दरवाजे , आतील कक्ष, प्रार्थनास्थळ बांधले. तसेच बुरुज भक्कम केले. सध्या आतील बांधकाम नष्ट झाले आहे.
• इसवी सन १६७२ साली ब्रिटिश व पोर्तुगीज यांमध्ये बिनसले. तेव्हा मुंबई बंदर व हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी पोर्तुगीजांनी हल्ला केला. तेव्हा येथे १०० सैन्य व तीस तोफा होत्या. पोर्तुगीजांना हा किल्ला जिंकता आला नाही.
• इसवी सन १४ फेब्रुवारी १६८९ साली जंजिऱ्याच्या सिद्दी याकूब खान याने येथे २५०० सैन्य घेऊन हल्ला केला. व माहीम ताब्यात घेतले. व प्रचंड लुटालुट केली.
• पुढे इंग्रजांनी हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला.
• १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
• पुढे या परिसरात अतिक्रमण झाले होते. अत्यंत गलिच्छ वातावरण होते. सध्या अतिक्रमण हटवून किल्याच्या अस्तित्वासाठी पुरातत्व खाते झटत आहे.
व पर्यटन विकास केला जात आहे.
• अशी आहे.महिम किल्ल्याची माहिती / mahim Fort information





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.