crossorigin='anonymous' src='https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1553308877182847'/> महाराष्ट्र किल्ले व स्थळे यांची माहिती Forts and places in maharashtra: वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत Veratgad kilyachi mahiti marathi madhe

बुधवार, १७ जून, २०२६

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत Veratgad kilyachi mahiti marathi madhe

 वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत
Veratgad kilyachi mahiti marathi madhe

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

• स्थान :

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात वाई जवळ सह्याद्री पर्वताच्या शंभू महादेव या उपरांगेत रायरेश्वर पठार ते शिखर शिंगणापूर पर्यंत रायरेश्वर पठार, केंजळगड, पांडवगड, मांढरदेवी, वारुगड, संतोषगड शिखरशिंगणापूर ही वसलेली आहेत. यामध्येच कृष्णा नदीच्या दक्षिणेकडे वाईच्या रक्षणार्थ बांधलेला गडकोट म्हणजे वैराटगड होय.

• उंची : 

वैराटगडाची सरासरी उंची ही १२०० मीटर म्हणजे ४००० फूट आहे.

वैराटगड किल्यावर जायचे कसे?

• पुणे हे येथून जवळ असलेले आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे.

• रस्त्याद्वारे पुणे – कोल्हापूर मार्गावर सातारा जिल्ह्यात पाचवड गावाजवळ वैराटगड आहे.

• स्थानिक वाट : १) उत्तरेकडून वाट – पाचवड येथून व्याजवाडी गावातून वैराटगडावर जाता येते. ही वाट खडा चढ असणारी आहे.

२) गणेशवाडी वाट : गडाच्या दक्षिणेकडील असणारी गणेशवाडी गावाहून येणारी वाट. ही सोयीस्कर आहे.

* गडावर पाहण्यायोग्य ठिकाणे :

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

 गणेशवाडी गावी आपण आपल्या खाजगी वाहनाने किंवा बसने पोहोचू शकतो. तिथे आल्यावर आपल्याला एक माहिती फलक लागतो. तिथून जवळच काही समाध्या पहायला मिळतात. तेथे असलेल्या मैदानात गाडी पार्क करुन गडाकडे जाऊ शकतो. तेथून जवळच आपल्याला विशाल वटवृक्ष पाहायला मिळतो. या वटवृक्षा जवळून जाणाऱ्या पायवाटेने आपण गडाकडे जाऊ लागतो. वाटेत आपल्याला शेंदूर लावलेला म्हसोबा देव पहायला मिळतो. त्या मागे एक धनगराची झोपडी आहे. तेथून मुख्य दरवाजाकडे जाताना उंच कडे लागतात.

• गडदा म्हणजे भूमिगत पाण्याची टाकी :

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

गच्च झाडीतून आपण कड्याकडे येऊन पोहोचतो.

कड्याजवळ खालील बाजूस आपल्याला भूमिगत खोदून बनवलेली पाण्याची टाकी पाहायला मिळतात. ही टाकी पाच पांडवांची प्रतीके आहेत. व त्यांनी निर्माण केली आहेत. असे मानले जाते. स्थानिक लोक त्यांना गडदा असे म्हणतात.

येथून थोड चढल्यावर आपल्याला खंबाटकी घाट, व्याजवाडी, वाई परिसर व नॅशनल हायवे क्रमांक ४ सरळ दिसतो.

• कात्याळ पायरी मार्ग :

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

तेथून पुढे खडक फोडून बनवलेला पायरी मार्ग लागतो. या मार्गाने अनेक ठिकाणी खडक बुरजांना वळसे घालून आपण मुख्य दरवाजा जवळ पोहोचतो.

• दरवाजा :

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. त्या शेजारी वडाचे झाड वाढलेले आहे. बाजूच्या देवड्या भंगलेल्या असून त्याच्या भिंती व आतील पायाभूत ठेवणं तेवढी पहायला मिळते.खालील बाजूस उंबरा अवशेष आहेत.

• शिव स्मारक व हनुमान मंदिर : :

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

गडावर आपल्याला एके ठिकाणी खुल्या वातावरणात असलेली हनुमंत मूर्ती पहायला मिळते. त्या शेजारी साधे कौलारू मंदिर आहे. तेथे छत्रपती शिवरायांची मूर्ती व हनुमंत देवतेची मूर्ती आहे. हनुमंत ही वीरश्री व संकट नाश करणारी बलोपासनेची देवता. म्हणून तिचे पूजन पूर्वीपासून गडावर केले जाई.

• पाण्याची तळी :

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

गडाच्या मध्यभागी आपल्याला जवळ जवळ असलेली व खोदून तयार केलेली खोल पाण्याची तीन तळी पहायला मिळतात. यातील दगड काढून ते येथील मंदिर, देवडी व इतर वास्तू बांधकाम करण्यासाठी वापरले गेले. व खुदाई केलेल्या जागी झालेल्या टाक्यात पानी व्यवस्थापन करण्यात आले. पाण्याच्या तळ्यां शेजारी असलेल्या झाडाखाली शेंदूर लावलेले देव पहायला मिळतात.

• विराटेश्वर मंदिर :

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

तळ्यापासून थोड्या अंतरावर आपल्याला एक साधे दगडी बांधकाम केलेले गड देवता वैराटेश्वर देवाचे मंदीर लागते. पुढे पत्रा घातलेला सभामंडप असून पुढे पुरातन गाभारा आहे. बाहेरील बाजूस वीरगळ व सतीशिळा पहायला मिळतात. तर गाभाऱ्यात शिवपिंड म्हणजेच विराटेश्वर आहे. येथे कासव, नंदी यज्ञ कुंड आहे. या मंदिरात अभयगिरी महाराज यांचे वास्तव्य होते. त्यांचे शिष्य देखील राहत होते.

• यमाई मंदिर : गडावर आपल्याला पुरातन अवस्थेत असलेले यमाई मंदिर पाहायला मिळते.

• वीरगळ : युद्धात तसेच अन्य संरक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वीरगळ उभा केली जाते. तसेच वीर पुरुषाची पत्नी त्यासोबत सती गेली तर तेथे सतीगळ उभा केली जाते. मंदिराशेजारी अशी वीरगळ व सतीगळ येथे पहायला मिळते.

• चोरवाट :

गडाच्या पश्चिम बाजूस आपल्याला एक चोरवाट पहायला मिळते. ही निसरडी व अवघड आहे.

• तासीवकडे व बुरुज तटबंदी :

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

गडाला उंच असा सभोवती तासिव कडा आहे. जी एकप्रकारे नैसर्गीक कात्याळ भिंत आहे. त्यामध्ये बुरुजासारखी वळणे दिसून येतात.

• सोंड : गडाच्या एका बाजूस अरुंद सोंडेसारखा भाग आहे.

• गडावर उत्खनन करत असताना आपल्याला पाटा वरवंटा, दगडी समई, उखळ, धातूचा हंडा व प्राचीन वस्तू सापडलेल्या आहेत.

• गडाचा पूर्व पश्चिम घेर मोठा असून १७ फूट उंच कातळ तटबंदी आहे.

वैराटगड किल्याची माहिती मराठी भाषेत  Veratgad kilyachi mahiti marathi madhe

वैराटगड किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती :

• वैराटगड हा किल्ला इसवी सन ११७८ ते इसवी सन ११९३ मध्ये शिलाहार राजा भोज यांनी बांधला.

• यानंतर काही काळ यादव तसेच सुलतानशाही, बहामनी सत्ता व पुढे आदिलशहाच्या ताब्यात हा किल्ला होता.

• वाई परिसरातील किल्ले जिंकताना हा किल्ला देखिल छत्रपती शिवराय यांनी आपल्या ताब्यात घेतला.

• संस्कृत कवी परमानंद यांच्या शिवभारत काव्यात या वाई प्रदेशाचा विराट नगर असा उल्लेख आहे.

• औरंगजेब बादशहाने पुढे हा किल्ला १६९९ साली जिंकून घेतला. व त्याचे नाव सर्जागड असे ठेवले गेले.

• पुढे हा किल्ला पेशवाईत व पेशवाई नंतर ब्रिटिश सत्तेच्या ताब्यात हा किल्ला गेला.

• अशी आहे वैराटगड किल्ल्या विषयी माहिती.veratgad kilyachi mahiti.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.

माहिम किला 1/ Mahim Fort1

माहिम किला (Mahim Fort) – इतिहास, घूमने की पूरी जानकारी, वास्तुकला और कैसे पहुँचें माहिम किला (Mahim Fort)  मुंबई के सबसे प्राचीन और ऐतिहासि...