मोहंनदरी किल्ला / शिडका किल्ला माहिती मराठी मध्ये
Mohandari fort/ shidaka fort nashik.
स्थान :
महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी गडाच्या परिसरात सातमाळा डोंगर रांगेत नांदुरी गावाजवळ मोहनदरी गावाजवळ मोहनदरी किल्ला आहे. याला सिडकाचा किल्ला आहे.
• किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• मुंबई किंवा पुणे येथून नाशिक येथे आल्यावर सापुतारा रोडवर - वणी हे गाव आहे. तेथून – नांदुरी अभोने रोडवर मोहनदरी गाव ३.५ किलोमीटर तेथून पायी चालत एक ते दीड तासात किल्यावर जाऊ शकतो.
• मोहनदरी गावातून गडावर जाण्यासाठी मार्ग आहेत.
• मोहनदारी गावातून गडाच्या निढ्याजवळ आल्यावर पलीकडे जाऊन उजव्या हाताला दरी तर डावीकडे किल्ला त्या पायवाटेने आपण दीड तासात गडावर पोहोचू शकतो.
• मोहनदरी गावातून किल्याच्या पूर्व बाजूस असलेल्या पूर्व टोकाकडे किल्याच्या डोंगर बाजूस असलेल्या घळीतून चढून पूर्व टोकाकडून गडावर जाऊ शकतो.
• मोहनदरी गावातून निढे तेथे बाजूला रोप सीडी आहे त्यावर चढून गडावर जाऊ शकतो.
• मोहनदरी किल्यावर पाहण्यास योग्य ठिकाणे :
• मोहनदरीकडे येताना नांदुरी जवळ परिसरात वीरगळी पहायला मिळते. जी ऐतिहासिक काळात लढाईमध्ये मरण पावलेल्या वीरांच्या प्रतिके आहेत. तसेच मोहनदरी फाट्यावर परिसरात तिन वीरगळी पहायला मिळतात.
मोहनदरी गावात आल्यावर पाय वाटेने अंदाज घेत. आपण निढें असलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचतो.
• निढें :
अग्निजन्य खडकात काळाच्या ओघात कठीण खडकात मृदू खडकाची निर्मिती झालेली दिसून येते. ही काळाच्या ओघात वाऱ्याच्या माऱ्याने मृदु खडकाची झीज होते. व मृदू ठिसूळ भाग बाजूला पडून तेथे छिद्र तयार होते. व कठीण भाग शिल्लक राहतो. त्यास निढे असे म्हणतात.
• स्थानिक अख्यायिका :
सप्तशृंगी देवी जेव्हा महिषासुराचा वध करण्यास प्रकट झाली. तेव्हा ती त्याच्या मागे लागली. तो रेड्याचे रुप घेऊन धावू लागला. मोहनदरी डोंगर पार करुन गेला. त्याला पकडताना देवीने या ठिकाणी लाथेचा प्रहार केला. त्यातून या डोंगरास छिद्र पडले असे मानले जाते.
• तटबंदी बुरुज :
उंच बेलाग कडे असलेल्या या किल्यावर तटबंदी ही नामशेष झाली आहे. तसेच बुरुजाचे थोडेफार बांधकाम घळीच्या ठिकाणी अवशेष रुपात आहे.
• पाण्याची टाकी :
पश्चिम टोकाकडून पूर्वेस जाताना दोन मुजलेली टाकी पाहायला मिळतात.
• बांधकाम ज्योती अवशेष :
थोड वर चढून गेल्यावर आपल्याला बांधकाम केलेल्या वास्तूंचे पायाभूत अवशेष पाहायला मिळतात.
• तिन पाण्याची टाकी :
तेथून वर चढून गेल्यावर तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यातील पाणी हे पिण्यायोग्य नाही.
• विस्तृत घाट माथा :
• गडाच्या वरील भागात आपल्याला विस्तृत घाट माथा पाहायला मिळतो. येथून आपल्याला पश्चिमेस आहिवंतगड, पूर्वेस कण्हेर , दक्षिण बाजूला सप्तशृंगी, मार्कंडेय , रवळ्या, जावळ्या, धोडप, उत्तरेस अभोणे गाव पायथ्याशी मोहनदरी गाव दिसते.
• मोहनदरी किल्याची ऐतिहासिक माहिती :
• मोहनदारी किल्ला हा सातमाळा डोंगर रांगेतील असून हा या परिसरात असलेल्या १८ किल्याच्या रांगेतील एक टेहळणी किल्ला आहे. या किल्यावर यादव, सुलतानशाही, मुघल, मराठा शासकांनी मध्ययुगीन काळात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन व्यापारी वाटेवर टेहळणी व ताबा ठेवण्यासाठी तसेच स्थानिक परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाल्याचे प्रथमदर्शी ओळखते. परिसरात आढळणाऱ्या विरगळी पाहून अनेक पराक्रमी वीर पुरुष या ठिकाणी सत्ता संघर्षात बळी पडल्याचे समजते. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यापारी व अन्नधान्य शेती केली जाते. काळाच्या ओघात या किल्ल्याकडे दुर्लक्ष होत गेल्याचे जाणवते. आता फक्त ऐतिहासिक पुरातत्वीय अवशेष शिल्लक आहेत.
• राहण्याची सोय :
मोहनदारी गावी असलेल्या आश्रमशाळेत स्थानिक परवानगी घेऊन राहू शकतो.
• जेवणाची सोय :
नांदुरी गावात आपल्या जेवणाची सोय होऊ शकते.
• पाण्याची सोय :
गडावरील टाक्यांमध्ये पाणी आहे. पण ते पिण्यायोग्य नाही.
अशी आहे मोहनदरी / शिडका किल्याच्या विषयी माहिती.Mohandari/ shidaka fort in nashik.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.