crossorigin='anonymous' src='https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1553308877182847'/> महाराष्ट्र किल्ले व स्थळे यांची माहिती Forts and places in maharashtra: कमळगड किल्ला / kamalgad killa

गुरुवार, २८ मे, २०२६

कमळगड किल्ला / kamalgad killa

 

कमळगड किल्ला / kamalgad killa

कमळगड किल्ला / kamalgad killa


• स्थान : 

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात असलेल्या वाई तालुक्यातील धोम धरणाच्या बॅक वॉटर परिसरात कमळगड किल्ला स्थित आहे.

• उंची : 

 कमळगड किल्ला हा समुद्र सपाटी पासून सरासरी ४२०० मीटर उंचीवर आहे.

कमळगड किल्ला पहायला जाण्यासाठी प्रवासी मार्ग :

• पुणे येथून १२० किलोमीटर अंतरावर कमळगड किल्ला आहे.

• सातारा या जिल्हा ठिकाणापासून ६० किलोमीटर अंतरावर कमळगड किल्ला आहे.

• वाई येथून २९ किलोमीटर अंतरावर कमळगड आहे.

• जवळील रेल्वे स्टेशन हे सातारा आहे.

• जवळील विमानतळ हा पुणे आहे.

जवळील ठिकाण :

कमळगड किल्ला / kamalgad killa


• वाई तालुक्यातील धोम धरणाच्या बॅक वॉटर परिसरात असलेल्या नांदगण व कोंडवली गावातून कमळगड किल्ला पहायला जाता येते. कोंडवली गावाची वाट अवघड असली. तरी कमी वेळात ट्रेक करता येतो. हा ट्रेक दीड तासात करता येतो.

• नांदगण गावातून जाणारी वाट ही सुलभ असली. तरी दोन ते अडीच तास पायपीट करुन गड पहायला जाता येते.

• तसेच वासोळी व तुपेवाडी या मार्गे देखील गडाकडे जाऊ शकतो. वासोळी गावातील गोरक्षनाथ मंदिर परिसरातून गडाकडे जाता येते.

• या गावांना जाण्यासाठी बसची सोय देखील आहे.


कमळगड किल्ल्यावर पाहण्यायोग्य ठिकाणे :

• कोंडवली गावात आल्यावर गावाच्या बाहेर असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात गाडी पार्क करुन पायी चालत आपण कमळगड किल्ल्याकडे जाऊ लागतो.

• सिद्धेश्वर महादेव मंदिर :

कोंडवली गावचे ग्रामदैवत सिद्धेश्वर असून हे एक महादेव मंदीर आहे.

• गोरक्षनाथ मंदिर :

कमळगड किल्ला / kamalgad killa


पायी चालत पुढे गेल्यावर आपल्याला गोरक्षनाथ मंदिर लागते. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथ देवाचे हे मंदिर असून. ते कौलारू आहे. गाभाऱ्यात सुंदर नाथांची व इतर देवतांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर वासोळी गावाच्या हद्दीत येते.

• नांदगण गावातून येताना देखील गोरक्षनाथ मंदिर लागते.

• पाण्याचे टाके :

कमळगड किल्ला / kamalgad killa


मंदिर परिसरातून पुढे जाताना आपल्याला नैसर्गिक झरा लागतो. या झऱ्याचे पाणी पुढे कात्याळ कुंडात येते. तेथून पुढे ते कड्यावरून खाली असलेल्या ओढ्यात जाते. हे टाके नांदगण येथून येताना लागते.

• सडा पठार व उपहारगृह :

कमळगड किल्ला / kamalgad killa


दोन्ही गावाहून येणाऱ्या वाटा एकत्र वरील सडा पठारी भागात येतात. येथे स्थानिक ग्रामस्थांनी उपहारगृह सुरू केले आहे. येथे नाष्टा पाण्याची सोय होते.

• गडाकडे : येथून जवळच दिशादर्शक बाण आहे. त्या वाटेने आपण झाडीतून गडाकडे जाऊ शकतो. हा परिसर घनदाट जंगलाचा असल्याने येथे येताना सोबत कुणीतरी असलेले चांगले. तसेच स्थानिक नागरिक असेल तर वाट चुकण्याचा धोका नसतो. या वाटेने आपण सीडी बसवलेल्या मार्गा जवळ जाऊन पोहोचतो.

• सीडी मार्ग :

कमळगड किल्ला / kamalgad killa


गडाच्या वरील भागात आल्यावर तिथे दोन खडकातून भुयार आहे. वरील खडक एकत्र जुळल्याने ते तयार झाले आहे. येथे पायरी मार्ग होता. तो काळाच्या ओघात नष्ट झाला आहे. तेथे हल्ली लोखंडी सीडी बसवलेली आहे.

• कात्याळ पठार :

वर विस्तृत असे जांभा पठार लागते. हा बालेकिल्ला आहे.


कमळगड किल्ला / kamalgad killa

• कावेची विहीर :

तेथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला एक तलवारीच्या आकाराची विहीर लागते. ही कावेची विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायरी मार्ग आहे. आतील माती लाल रंगाची असून तिला स्थानिक घाटी भागात गेरू किंवा काऊ म्हणतात. म्हणून तिला कावेची विहीर असे म्हटले जाते. पावसाळ्यात जांभा खडकात मुरलेले पाणी येथे उमटते. तसेच विहिरीत आतील बाजूस भुयारी गुहा आहे. पावसाळ्यात उबदार तर उन्हाळ्यात थंड पाणी येथे जाणवते.

कमळगड किल्ला / kamalgad killa


• पाणी टाके :

 गडावर विहिरी शेजारी चौकोनी खोदलेले टाके दिसते. त्यामध्ये पडलेले पाणी विहिरीत उतरते.

• महादेव पिंडी :

कमळगड किल्ला / kamalgad killa


गडावर एका बाजूला खडकात कोरलेली महादेव पिंडी पाहायला मिळते. ही समाधी पिंडी वाटते.

• ध्वज स्तंभ : 

एका बाजूला आपल्याला ध्वज स्तंभ पहायला मिळतो. त्या शेजारी थोडे बांधकाम आढळते.

• तटबंदी : 

कमळगड किल्ला / kamalgad killa


गडावर बांधीव तटबंदी अस्तित्वात नाही. गडाला नैसर्गिक कडा उंच असल्याने. गडावर चढाई करणे अवघड आहे. व हा घनदाट जंगलात असल्याने गनिमी कावा युद्ध तंत्र अवलंबण्यास योग्य गड होता.

• दरवाजा : सध्या गडावर एकही दरवाजा अस्तित्वात नाही.

• बुरुज :

एका बाजूला गडाच्या टोकास बुरुजासारखा कडा आहे. खाली घनदाट झाडी आहे.

कमळगड किल्ला / kamalgad killa


किल्ल्यावरून तसेच परिसरात पाहण्यायोग्य ठिकाणे :

• किल्ल्यावरून आपल्याला नैऋत्य बाजूस केंजळगड, पाठीमागे रायरेश्वर पठार, कोळेश्वर पठारर, धोम धरण, तसेच वाळकी नदीचे खोरे, महाबळेश्वर, तसेच पाचगणी पाहता येते. तसेच धोम ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेले धोम गावी असलेले महादेव मंदिर देखील परिसरात आहे.

• भोम गावी वामन पंडित मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी त्यांची समाधी आहे.

कमळगड किल्याची ऐतिहासिक माहिती :

• हा किल्ला कोणी बांधला याबाबत लिखित पुरावा नाही. पण हा परिसर पूर्वी हिंदू राजवटीत विशेषत शिलाहार राजे, सातवाहन घराणे या राजवटीत होता.

• पुढे सुलतानशाही व बहामनी सत्तेच्या ताब्यात येथील प्रदेश होता.

• पुढे हा किल्ला व परिसर आदिलशाही राजवटीत आला.

• छत्रपती शिवराय यांनी इसवी सन १६५० – ६० या दरम्यान हा किल्ला स्वराज्यात आणला.

• या किल्याचे नियंत्रण पिलाजी गोळे यांच्या ताब्यात काही काळ होते.

• पुढे छत्रपती संभाजीराजे यांच्या काळात देखील हा किल्ला स्वराज्यात होता.

• पुढे शाहू महाराजांच्या काळात देखील हा किल्ला स्वराज्यात होता.

• पुढे हा किल्ला ब्रिटिश राजवट स्थापित होई पर्यंत मराठा साम्राज्यात राहिला. पुढे ब्रिटिश सत्तेच्या ताब्यात हा किल्ला गेला.

• हा किल्ला विशेषत टेहळणीसाठी बांधला गेला. होता. सैनिक व इतर साहित्याची वाहतूक करताना या किल्याची मदत होत असे. त्यामुळे येथे जास्त बांधकाम पहायला मिळत नाही.

• १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.

• अशी आहे कमळगड किल्याची ऐतिहासिक माहिती.

• Kamalgad killyachi mahiti marathi madhe.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.

माहिम किला 1/ Mahim Fort1

माहिम किला (Mahim Fort) – इतिहास, घूमने की पूरी जानकारी, वास्तुकला और कैसे पहुँचें माहिम किला (Mahim Fort)  मुंबई के सबसे प्राचीन और ऐतिहासि...