रत्नदुर्ग किल्ला – रत्नागिरीचा समुद्रकाठावरील ऐतिहासिक वैभव/ ratndurg killyachi mahiti marathi madhe
✨ प्रस्तावना
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर वसलेला रत्नदुर्ग किल्ला हा इतिहास, निसर्गसौंदर्य आणि समुद्राचे भव्य दर्शन यांचा अनोखा संगम आहे. रत्नागिरी शहराजवळ असलेला हा किल्ला आजही आपल्या भक्कम तटबंदीमुळे आणि विस्तीर्ण परिसरामुळे पर्यटकांना आकर्षित करतो.
• क्षेत्रफळ :
या किल्याचे क्षेत्रफळ हे १२० एकर आहे.
📍 रत्नदुर्ग किल्ला कुठे आहे?
जिल्हा : रत्नागिरी
राज्य : महाराष्ट्र
स्थान : रत्नागिरी शहराजवळ, अरब सागराच्या किनाऱ्यावर हा किल्ला थेट समुद्राला लागून असल्यामुळे येथे उभे राहिल्यावर अथांग समुद्राचे मनमोहक दृश्य दिसते.
• किल्यावर पाहण्यासारखी
ठिकाणे :
रत्नागिरी शहरातून २ ते ३ किलोमीटर अंतरावर किनारी भागात समुद्रास लागून असलेल्या किल्याच्या पायथ्याशी येऊ शकतो. यासाठी खाजगी वाहनाने किंवा ऑटोरिक्षा, बसद्वारे आपण पायथ्याशी येऊन पोहोचतो.
• शिवसृष्टी :
किल्याच्या पायथ्याकडे येताना आपल्याला वाटेत शिवसृष्टी नावाचे ठिकाण लागते. ठिकाणी पर्यटकांना आकर्षक अशी शिवकालीन किल्ल्यांच्या प्रतिकृती निर्माण केलेल्या आहेत. निरनिराळे शिवकालीन पुतळे. गावे, तसेच समुद्री जहाजे गुराब, गलबत त्याकाळी होऊन गेलेल्या वास्तू रचना निर्माण केलेल्या आहेत. मध्यभागी शिवपुतळा आहे. शिवसृष्टी पाहिल्यावर शिवकाळात गेल्यासारखे वाटते.
• बालेकिल्ला :
किल्ल्याचा जीर्णोध्दार केल्यामुळे अलीकडे किल्यावर जाण्यासाठी इसवी सन १९४० साली तटबंदी पाडून तयार केलेल्या रस्त्याने आज नवीन रस्ता बांधला आहे. या रस्त्याने आपण बालेकिल्ल्याच्या आवारात येऊन पोहोचतो.
• बालेकिल्ला प्रवेशद्वार :
बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार नवीन बांधकाम केले असून बाहेरील बाजूस हत्तीवर स्वार झालेल्या मावळ्यांची प्रतिकृती आहे. येथून किल्यात प्रवेश करता येतो. सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत किल्ला पाहण्यास परवानगी आहे. सुंदर नक्षीदार प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपणास पायरी मार्ग लागतो. या मार्गाने आत येताना आपल्याला दोन्ही बाजूला हिंदू देवतांची छोटी घुमटी पहायला मिळते. यामध्ये विघ्नहर्ता गणेश व दुसरीकडे बाजूला हनुमंत देवतेची मूर्ती पाहता येते. या देवतेचे दर्शन घेऊन आपण बालेकिल्ल्याच्या भागात प्रवेश करतो.
• भगवती मंदिर / रत्नदेवी मंदिर :
बालेकील्यावर आपणास नवीन बांधलेले एक मंदिर पाहायला मिळते. बाह्य सभामंडप अंतराळ मग गर्भगृह अशी रचना या मंदिराची आहे. आधुनिक शैलीत बांधलेले हे मंदिर असून गर्भगृहात देवी भगवती ची मूर्ती असून पाठीमागे सुंदर महिरप आहे. बाहेरील बाजूस तिचे वाहन आहे. अंतराळा शेजारी देव चव्हाटा देवाचे छोटेसे घुमटी मंदिर आहे. ही एक जागृत देवता मानली जाते. अनेक हिंदू भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. देवीच्या मंदिरा बाहेर दीपमाळ व सुंदर तुळशी वृंदावन पाहायला मिळते.
• कान्होजी आंग्रे यांचा पुतळा :
गडावर मंदिराशेजारी आपल्याला सरखेल दर्या सारंग, मराठी आरमार प्रमुख, समुद्री शिवाजी म्हणून मान्यता पावलेले कान्होजी आंग्रे यांचा पुतळा येथे पहायला मिळतो.
• सती स्मारक :
तटबंदी वरून फिरताना आपल्याला गडाच्या एका भागात सती स्मारक पाहायला मिळते. किल्यावर पूर्वी असणारे नलवडे सरदार घराण्याचे सती स्मारक आपल्याला पाहायला मिळते. तसेच पुढे आणखी एक स्मारक आहे.
• विहीर :
गडावर पूर्वी खोदलेल्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी विहिरी पहायला मिळतात.
• भुयार :
गडावर आपल्याला एका चौकोनी कंपाऊंड मध्ये एक भूमिगत भुयार पाहायला मिळते. जिथून एक गुप्त मार्ग खालील समुद्र बाजूस असलेल्या सागरी गुहेत निघतो. असे मानले जाते. समुद्री मार्गे किल्याचा संपर्क संकट काळी टिकून रहावा यासाठी हा मार्ग बनवला गेला असावा. तसेच समुद्री जहाजातून पूर्वी या मार्गाने व्यापार देखील केला जात असावा असे स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीवरून समजते. तसेच एक मार्ग गडावरील एका बुरुजात उघडतो.
• तटबंदी :
गडाला सुरेख तटबंदी बांधलेली आहे. जुन्या तटबंदीचा बराचसा भाग जीर्णोध्दार केलेला आहे. जागोजागी जंग्या ठेवलेल्या दिसून येतात. तसेच तटबंदीवर चढण्यासाठी व उतरण्यासाठी जागोजागी पायऱ्या ठेवलेल्या दिसून येतात.
• बुरुज :
गडाच्या तटबंदीमध्ये जागोजागी बुरुज निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये तोफेच्या फांज्या व गोळीबार व बाण मारण्यासाठी जंग्या ठेवलेल्या दिसून येतात. बरेच बुरुज जीर्णोध्दार केलेले आहेत. यामध्ये मुख्य रेडे बुरुज आहे. जिथे स्मारक पहायला मिळते. तसेच बसक्या बुरुज , मारक्या बुरुज, वेताळ मंदिर शेजारी असणारा वेताळ बुरुज, टेळक्य बुरुज, वाघ्या बुरुज, गणेश बुरुज, असे अनेक बुरुज किल्ल्यास जागोजागी दिसून येतात.
• प्रवेशद्वार :
किल्ल्याला पूर्वी दोन प्रवेशद्वारे होती. आग्नेय बाजूचे प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे. मात्र समुद्र किनारी असणारी तटबंदी नष्ट झाली तिकडील प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे.
• हनुमान मंदिर :
हनुमंत ही वीर देवता. मावळ्याना प्रेरणा देण्यासाठी पूर्वी गडावर हनुमंत देवतेची मंदिरे स्थापन केली जात. या ठिकाणी देखील हनुमंत मंदिर पाहायला मिळते. हनुमंत ही संकटमोचन देवता असल्याने तिची आराधना मावळे करत असत. त्यामुळे येथे गडाच्या प्रवेशद्वार शेजारी आपल्याला हनुमंत मंदिर आढळते.
• समुद्र किनारा :
गडाच्या तिन्ही बाजूस आपल्याला समुद्र पहायला मिळतो. येथील अग्निजन्य खडकामुळे येथील पाणी काळसर दिसते. म्हणून या समुद्री भागास काळा समुद्र असे देखील म्हटले जाते. भरतीच्या वेळी पाणी किल्याच्या तटबंदी पर्यंत येते. एका बाजूने हा किल्ला आग्नेय बाजूने जमिनीस जोडला गेला आहे. समुद्र किनारी असला तरी हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात येतो.
• रत्नागिरी महाराज समाधी :
या ठिकाणी पूर्वी रतनगिरी महाराज राहत होते. त्याची समाधी किल्यावर पहायला मिळते. काही स्थानिक लोकांच्या मते. रतनगिरी महाराज यांच्या नावावरून या किल्ल्यास रत्नगिरी नाव पडले आहे.
• पेठ :
मारुती मंदीर व रतनगिरी महाराज समाधी दरम्यान पडलेल्या वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. ते ऐतिहासिक पेठेच आहेत. या ठिकाणी पूर्वी बाजारपेठ होती.
• भागेश्वर मंदीर :
किल्याच्या मध्य भागात भागेश्वर देवाचे मंदीर आहे.
• कडेलोट पॉईंट :
समुद्राच्या बाजूला पदकोटच्या बाजूला काही अंतरावर असणाऱ्या बुरुजात शेजारी उंच जागी कडेलोट पॉईंट आहे. येथून अनेक भयंकर फितुरीचा अथवा गंभीर गुन्हा करणाऱ्या कैद्यांना येथून कड्यावरून खाली ढकलले जात असे.
• दीपस्तंभ :
हा परिसर समुद्र किनाऱ्यावर असल्याने येथे आपल्याला जहाजांना दिशा दाखवणारा मनोरा म्हणजेच दीपस्तंभ उभारलेला पहायला मिळतो.
किल्याच्या पडकोट भागात आपणास हा समुद शेजारी हा दीपस्तंभ उभारलेला दिसतो.
🧱 किल्ल्याची रचना व वैशिष्ट्ये
भक्कम दगडी तटबंदी
मजबूत प्रवेशद्वार
समुद्राकडे तोंड करून उभारलेले बुरुज
किल्ल्याच्या कडेकडून दिसणारे अथांग समुद्रदृश्य
किल्ल्याचा विस्तीर्ण आणि स्वच्छ परिसर
रत्नदुर्ग किल्ल्याची बांधणी ही कोकणातील किल्ल्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचे उत्तम उदाहरण आहे.
🌊 निसर्गसौंदर्य आणि पर्यटन
रत्नदुर्ग किल्ला हा फक्त ऐतिहासिक स्थळ नसून निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफर्ससाठी स्वर्ग आहे.
सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी समुद्रावर पडणारे सोनेरी प्रतिबिंब अतिशय सुंदर दिसते.
🧭 रत्नदुर्ग किल्ला भेट देण्याचा उत्तम काळ
ऑक्टोबर ते फेब्रुवारी – हवामान आल्हाददायक
पावसाळ्यात निसर्ग सुंदर असतो, पण काळजी घेणे आवश्यक
🚶 किल्ल्यावर कसे जायचे?
रत्नागिरी शहरातून स्थानिक वाहनाने सहज पोहोचता येते
रेल्वे व बस मार्गे रत्नागिरीपर्यंत पोहोचून पुढे किल्ल्याकडे जाता येते
रत्नदुर्ग किल्ल्याचा इतिहास :
रत्नदुर्ग किल्ला हा प्राचीन काळापासून सामरिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.
समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असे. मराठा काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व होते. पुढील काळात विविध सत्तांनी या किल्ल्यावर आपला अंमल प्रस्थापित केला.
• बहामनी सत्तेच्या काळात हे ठिकाण व्यापारी माल समुद्र मार्गे पाठवण्यासाठी येथे बंदर विकास करण्यात आला.
• बहामनी सत्तेच्या विघटनानंतर येथे आदिलशहाचा अंमल होता.
• इसवी सन १६७० साली आदिलशहाकडून हा प्रदेश छत्रपती शिवराय यांनी हा प्रदेश जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला.
• इसवी सन १७९० साली धोंडू भास्कर यांनी या गडाची पुनर्बांधणी केली.
• पुढे हा किल्ला मराठी सत्तेच्या ऱ्हासानंतर ब्रिटिश सरकारच्या ताब्यात गेला.
• इसवी सन १९४० सालात थोर उद्योजक व समाजसेवक श्रीमान भागोजी शेठ किर यांनी गडावर जाण्यासाठी तटबंदी तोडून रस्ता तयार केला.
• पुढे १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
• आता येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या वतीने नवीन उपक्रम राबविण्यात येतात.
📝 निष्कर्ष
रत्नदुर्ग किल्ला हा इतिहास, निसर्ग आणि समुद्र यांचा संगम असलेले एक अप्रतिम पर्यटनस्थळ आहे. कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने या किल्ल्याला नक्की भेट द्यावी.
• अशी आहे रत्नदुर्ग किल्ल्याविषयी माहिती.
• Ratndurg killyachi mahiti marathi madhe















कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.